Ayodhya Ram Mandir | पहिल्याच दिवशी इतक्या लाख भाविकांनी घेतलं रामललाच दर्शन, प्रचंड गर्दी, वाहन रोखली

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराच सोमवारी उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याचदिवशी मंगळवारी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्यादिवशी तब्बल इतक्या लाख भाविकांनी दर्शन घेतलं. अयोध्येतून जे व्हिडिओ समोर आले, त्यात चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती.

Ayodhya Ram Mandir | पहिल्याच दिवशी इतक्या लाख भाविकांनी घेतलं रामललाच दर्शन, प्रचंड गर्दी, वाहन रोखली
huge rush in ram mandir
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 8:27 AM

Ayodhya Ram Mandir | अयोध्येत सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर मंगळवारी मंदिर भाविकांसाठी अधिकृतपणे खुल झालं. दर्शनासाठी मंदिर खुल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठा रेकॉर्ड झाला. मोठ्या संख्येने भाविकांनी आपल्या आराध्य देवतेच दर्शन घेतलं. काल प्रचंड गर्दी झाली होती. अयोध्येतून जे व्हिडिओ समोर आले, त्यात चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. अयोध्येत भक्तांची गर्दी वाढत होती. त्यामुळे प्रशासनाला तात्काळ अयोध्येत वाहन बंदीचा निर्णय घ्यावा लागला. एका व्हिडिओमध्ये तर भाविक सुरक्षाकड भेदून मंदिराच्या दिशेने पळत होते. काहींना किरकोळ दुखापती झाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधूनच लाइव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधी उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं. त्यानंतर स्वत: तिथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भक्तांच्या सुविधेसाठी आठ ठिकाणी सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलय. मंदिर खुल झाल्यानंतर पहिल्याचदिवशी पाच लाख भाविकांनी रामललाच दर्शन घेतलं. अयोध्येत रामललाच्या दर्शनासाठी गर्दी वाढत होती. त्यामुळे तात्काळ प्रभावाने गाडया रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.

100 किलोमीटर आधीच रोखलं

भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन बाराबंकी पोलिसांनी भाविकांना पुढे न जाण्याच आवाहन केलं. बाराबंकी अयोध्येपासून 100 किमी अंतरावर आहे. आज दुसऱ्यादिवशी सुद्धा भाविक रामललाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच उद्घाटन झालं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राम मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठेच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.