Anju pakistan | आणखी एक अंजू! पाकिस्तानातून अस्लम लाहोरीकडून ब्रेनवॉश, समोर आली धक्कादायक माहिती

Anju in pakistan | लाहोरच्या मुलावर जडला जीव, पाकिस्तानात निघालेली मुलगी. या मुलीला कसं ट्रेन करण्यात आलं होतं? चौकशीत तिने जे सांगितलं, ते खूपच धक्कादायक आहे.

Anju pakistan | आणखी एक अंजू! पाकिस्तानातून अस्लम लाहोरीकडून ब्रेनवॉश, समोर आली धक्कादायक माहिती
one more anjun going to pakistan for love
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 11:13 AM

नवी दिल्ली : सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली. त्यावेळी सीमापार प्रेमाच्या काही खऱ्या आणि काही खोट्या गोष्टी समोर आल्या. आता प्रेमासाठी सीमा ओलांडणाऱ्या मुलींची संख्या वाढत चालली आहे. याची सुरुवात सोशल मीडियावरुन होते. सीमा पबजी खेळता-खेळता भारतात आली. अंजू फेसबुक प्रियकरासोबत लग्नासाठी भारतातून पाकिस्तानात गेली. आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. एक अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरुन ओळख झालेल्या प्रियकरासाठी पाकिस्तानात निघाली होती.

जयपूर एअरपोर्टवर या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं. ती लाहोरला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी निघाली होती. एअरपोर्टच्या काऊंटरवर या अल्पवयीन मुलीने पाकिस्तानच तिकीट मागितलं, त्यावेळी सगळेच हैराण झाले. मुलीच वय पाहून तिकीट मास्टर आणि सुरक्षा रक्षकाला आधी ती मस्करी करतेय असं वाटलं. पण चौकशीत तिने जे सांगितलं, त्यातून पाकिस्तानातून तिचं ब्रेनवॉश झाल्याच स्पष्ट होतं.

पाकिस्तानातून असं केलं ब्रेनवॉश

एअरपोर्टवर कसं बोलायच? हे तिला पाकिस्तानातील तिच्या प्रियकराने सांगितलं होतं. चौकशीत कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, याची ट्रेनिंग पाकिस्तानी मुलाने तिला दिली होती. मुलीने सुरक्षा रक्षकाला सांगितलं की, “ती एक पाकिस्तानी आहे. तीन वर्षांपूर्वी इस्लामाबादहून भारतात आली होती. आत्यासोबत मी भारतात आले. तिच्याच घरात रहात होते. आता आत्याबरोबर भांडण होतय. त्यामुळे पुन्हा पाकिस्तानात जायचं आहे” सुरक्षा रक्षक मुलीच हे म्हणण ऐकून थक्क झाला. चौकशीमध्ये कळलं की, ती सीकर जिल्ह्याच्या श्रीमाधोपुरची रहिवासी आहे. पाकिस्तानी मुलाचं नाव काय ?

मुलीच्या मोबाइल फोनवरुन ती लाहोरमधील एका मुलाच्या संपर्कात असल्याच स्पष्ट झालं. एकवर्षापासून पाकिस्तानी मुलासोबत चॅटिंग करत असल्याच तिने सांगितलं. मुलीचे आणखी काही मित्र त्याच मुलाच्या संपर्कात आहेत. अस्लम लाहोरी नावाच्या मुलाने तिचं ब्रेनवॉश केलं होतं. एअरपोर्टवर कसं बोलायच याची ट्रेनिंग दिली. आता मुलीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढे तपास सुरु आहे. आणखी कुठली मुलगी त्याच्या संपर्कात होती का? याचा शोध घेतला जातोय.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.