Okra Farming : भेंडीने बदलले नशीब, कमाईत मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना टाकले मागे

Okra Farming : टोमॅटो, अद्रकच नाही तर भेंडीने पण शेतकऱ्यांचे नशीब पालटले आहे. अनेक कास्तकारांना मोठा फायदा झाला. कमाईत त्यांनी मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना मागे टाकले आहे.

Okra Farming : भेंडीने बदलले नशीब, कमाईत मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांना टाकले मागे
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 6:30 PM

नवी दिल्ली | 29 जुलै 2023 : मुसळधार पावसाने देशात महागाईचे पिक आणले आहे. टोमॅटोने (Tomato Price) तर मोठा कहर केला आहे. अद्रक, हिरवी मिरची, बटाटे, भोपळा, काकडी आणि कारले यांचे भाव पण वाढले आहे. सर्वच भाजीपाला महागला आहे. पण ही गोष्ट अनेक शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. टोमॅटो, अद्रकीने पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. त्यांना जोरदार परतावा मिळाला. काही जण चारच दिवसात लखपती तर महिन्याभरात करोडपती झाले. त्यांना 20 वर्षांत कमाई करता आली नाही, पण गेल्या वर्षात ते मालामाल झाले. आता भेंडीमुळे (Okra Farming) शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.

बिहारमधील शेतकरी मालामाल

बिहारमधील शेतकऱ्याला मोठा फायदा झाला. बेगुसराय जिल्ह्यातील बिक्रमपूर येथील रामविलास साह यांना लॉटरी लागली. त्यांनी भेंडीमुळे मोठी कमाई केली. भेंडीच्या शेतीने रामविलास लाखो रुपयांची कमाई करत आहेत. या महिन्यात त्यांनी एक लाख रुपयांपेक्षा अधिकची भेंडी विक्री केली. त्यांची भेंडी हातोहात विक्री होत आहे. व्यापारी शेतात येऊनच भेंडीची खरेदी करत आहे. महागाईत भेंडीला चांगला भाव मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

6 महिन्यात कमावले 10 लाख

रामविलास साह राजस्थानमध्ये मोलमजुरी करत होते. दहा वर्षांपूर्वी ते छठ पुजेसाठी गावी आले होते. तेव्हा शेजारच्या शेतात त्यांना भेंडीचे पिक दिसले. त्यांनी पण भेंडीची लागवड सुरु केली. त्यातून त्यांना चांगला नफा मिळाला. रामविलास यांनी सुरुवातीला मोठे उत्पन्न घेतले नाही. पण चांगला फायदा होऊ लागल्यानंतर त्यांनी पेरा वाढवला. आता एक एकर शेतात ते भेंडीचे पिक घेतात. या 6 महिन्यात भेंडीच्या पिकातून त्यांनी 10 लाख रुपयांची कमाई केली.

काय आहे खर्चाचे गणित

रामविलास साह यांनी खर्चाचे गणित मांडले. त्यानुसार, एका पेऱ्यासाठी त्यांना 3 हजार रुपये का खर्च आला. त्यातून प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपयांची कमाई झाली. एक एकर शेतीत त्यांनी प्रत्येक महिन्यात लाखांची कमाई केली. या हंगामात तर त्यांनी निव्वळ 10 लाख रुपयांचा नफा कमावला. त्यांनी शेतात 6 महिलांना रोजगार दिला. त्यांच्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पण भेंडीची गोडी लागली आहे.

दक्षिणेतील राज्यांत उत्पादन

सध्या दक्षिणेतील राज्यातील उत्पादनावर किंमती अवलंबून आहेत. टोमॅटोचे उत्पादन देशात जवळपास सर्वच राज्यात घेण्यात येते. पश्चिमी आणि दक्षिणेतील राज्यात टोमॅटोचे उत्पादन जास्त होते. या भागात जवळपास 56 ते 58 टक्के उत्पादन घेण्यात येते. याभागात उत्पादन वाढले आहे. त्याचा फायदा उत्तर भारताला होणार आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.