AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सनातन धर्माची HIV बरोबर तुलना’, उदयनिधीनंतर डीएमकेच्या दुसऱ्या नेत्याच वादग्रस्त वक्तव्य

सनातन धर्मावरुन सुरु झालेला वाद वाढत चालला आहे. दक्षिणेतूनच नाही, बिहारमधूनही असं वक्तव्य समोर आलय. "हिंदुंना कमीपणा दाखवून आपण निवडणूका जिंकू शकतो असं त्यांना वाटतं" असं भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले.

'सनातन धर्माची HIV बरोबर तुलना', उदयनिधीनंतर डीएमकेच्या दुसऱ्या नेत्याच वादग्रस्त वक्तव्य
DMK Leaders
| Updated on: Sep 07, 2023 | 12:48 PM
Share

नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी सनातन धर्माबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन सुरु झालेला वाद अजून थांबलेला नाही. आता अजून एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. डीएमके खासदार ए. राजा यांनी, सनातन धर्माची तुलना HIV बरोबर केली आहे. त्यानंतर हा वाद वाढत चालला आहे. ए.राजा यांनी सनातन धर्मावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिबेटच आव्हान दिलं आहे. ए राजा या वादावर बुधवारी बोलले. “उदयनिधी या संपूर्ण वादावर जे काही बोलले, ते फार कमी आहे. त्यांनी फक्त मलेरिया आणि डेंग्यु म्हटलय. समाजात घृणास्पद म्हटलं जातं, असा हा आजार नाहीय. त्यांनी सनातनची तुलना HIV बरोबर केली. समाजासाठी सनातन असच काम करतं” असं ए राजा म्हणाले.

ए राजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. “पीएमने सुद्धा सनातन धर्माचा पालन कराव व परदेश दौऱ्यावर जाऊ नये. मी पंतप्रधान आणि अमित शाह यांना माझ्यासोबत सनातन धर्मावर चॅलेंज करण्य़ाच आव्हान करतो. दिल्लीत एक कोटी लोकांना बोलवा. शंकराचार्यांना बसवा आणि आपली सर्व शस्त्र सोडून द्या” असं राजा यांनी सांगितलं. ए राजाच्या वक्तव्यावर भाजपाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “उदयनिधी नंतर आता ए राजा सनातन धर्माला कमी लेखत आहेत. सनातन धर्माचा पालन करणाऱ्या हे देशातील 80 टक्के लोकांवर निशाणा साधण्यासारख आहे. काँग्रेस नेतृत्वाखालील INDIA आघाडीच हे सत्य आहे. हिंदुंना कमीपणा दाखवून आपण निवडणूका जिंकू शकतो असं त्यांना वाटतं” असं भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले.

‘त्यांनी देशाला गुलाम बनवलय’

दक्षिणेतूनच नाही, बिहारमधूनही असं वक्तव्य समोर आलय. राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशध्यक्ष जगदानंद म्हणाले की, “जे लोक टीका लावून फिरतात, त्यांनी देशाला गुलाम बनवलय. हे सर्व टीका लावणाऱ्यांमुळे झालय. भाजपा आणि आरएसएस देशाच विभाजन करत आहेत. यामुळे देश चालत नाही” हा सगळा वाद कधी सुरु झाला?

“आपण डेंग्यु, मलेरिया आणि कोरोनाला विरोध करु शकत नाही. आपल्याला या मच्छरांना संपवावच लागेल, तसच आपल्याला सनातनला संपवाव लागेल. सनातनला विरोध करण्याऐवजी संपवलच पाहिजे” असं उदयनिधी स्टालिन एका कार्यक्रमात म्हणाले होते.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.