“हिंदू राष्ट्र की बात बकवास…”; या नेत्यानं केंद्र सरकारवर केली सडकून टीका
धर्माविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या देशाला कोणताही धर्म नाही, त्यामुळे तुम्ही हिंदू राष्ट हेच का फालपूद लावता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यागोष्टीवरही सरकार गप्प का आहेत असा सवाल त्यांनी देशाला केला आहे.
नवी दिल्लीः बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रावर टीका करताना त्यांनी लोकशाहीसाठी पत्रकारिता ही महत्त्वाची आहे. मात्र आपल्या देशात माध्यमांना मुक्तपणे काम करु दिले जात नाही. त्यांच्यावर बंधने लादून पत्रकारांनी केवळ एकाच पक्षाचे चांगले गुण दाखवले तर लोकशाही कमकुवत होईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
यावेळी बीबीसीच्या कार्यालयावर आयकरने धाड टाकल्या प्रकरणी ओवेसी यांनी केंद्रावर जोरदार प्रहार केला आहे. गुजरातमध्ये जे घडले ते कोण नाकारू शकेल का. त्यामुळे आज छापा टाकला जात आहे.
तर ज्यांनी सत्य सांगितले आहे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अशा प्रकारामुळे सर्वांचेच नुकसान होणार आहे. केंद्राच्या या प्रकारामुळेच आम्ही हा मुद्दा संसदेत मांडला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.
हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानींची 40 टक्के संपत्ती नष्ट झाली असल्याचेही ओवेसी यांनी सांगितले. ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान चीनचे नाव घ्यायला घाबरतात, त्याचप्रमाणे ते अदानींचे नाव घ्यायलाही घाबरतात.
तर दुसरीकडे, आझम खान यांच्याबाबत ओवेसी यांनी सांगितले की, ते आंदोलन करतीलही मात्र त्यावर न्यायालयाचा निर्णय आला आहे त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी रक्त सांडले आहे.
त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून त्यांच्या बलिदान ते व्यर्थ ठरवत आहेत. त्यामुळे या अशा वक्तव्यामुळेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही तो अपमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
धर्माविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, या देशाला कोणताही धर्म नाही, त्यामुळे तुम्ही हिंदू राष्ट हेच का फालपूद लावता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यागोष्टीवरही सरकार गप्प का आहेत असा सवाल त्यांनी देशाला केला आहे.
ओवेसी पुढे म्हणाले की, आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र कसे बनवू देऊ असे असेल तर आंबेडकरांचे संविधान तुम्ही जाळणार का? आणि स्वातंत्र्यावीरांचे बलिदान व्यर्थ ठरवाल का? हा सगळा मूर्खपणा आहे. प्रत्यक्षात बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागाच्या छाप्यांमुळेही त्यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे.
डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर लगेचच बीबीसी कार्यालयांवर अशा कारवाईसाठी विरोधक मोदी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका करत आहेत.
काँग्रेसनेही पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, एकेकाळी नरेंद्र मोदी फक्त बीबीसीवर विश्वास ठेवायचे, पण आज त्यांच्यावर छापे टाकले जात आहेत अशी टीका त्यांनी केंद्रावर केली आहे.