Air fare increased : विमान प्रवास महागला, ३० टक्के अधिक भाडे मोजावे लागणार
विमान कंपन्यांना दिलासा देताना आपल्या क्षमतेच्या 80 टक्के पर्यंत जागा वापराची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर प्रवास भाडे वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान कंपन्यांना दिलासा देताना आपल्या क्षमतेच्या 80 टक्के पर्यंत जागा वापराची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर प्रवास भाडे वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. लॉकडाऊननंतर विमान वाहतूक सुरु करण्यात आली होती तेव्हा वेगवेगळ्या मार्गांसाठी प्रवास भाडे निश्चित करण्यात आले होते. आता किमान भाडे 10 टक्के तर कमाल भाडे 30 टक्के वाढवण्यात आला आहे. हा नियम 31 मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे.(Air travel becomes more expensive, Decision of Ministry of Civil Aviation)
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर जेव्हा देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाली होती, तेव्हा प्रवासाला लागणाऱ्या वेळेनुसार देशातील 7 मार्गांची विभागणी करण्यात आली होती. या प्रत्येक मार्गासाठी किमान आणि कमाल प्रवास भाडे निश्चित करण्यात आले होते. नागरी उड्डाण मंत्रालयाने याच कॅटेगरीमध्ये किमान 10 टक्के आणि कमाल 30 टक्के प्रवास भाडे वाढवले आहे. जुन्या नियमांनुसार दिल्ली मुंबई मार्गावरील किमान भाडे 3 हजार 500 रुपये, तर कमाल भाडे 10 हजार रुपये होते. आता हेच भाडे 3 हजार 900 रुपये तर कमाल भाडे 13 हजार रुपये झालं आहे.
इकॉनॉमी क्लाससाठी भाडे
हे भाडे इकॉनॉमी क्लाससाठी आहे. सोबतच यात युजर्स डेव्हल्पमेंट फी, पॅसेंजर सेक्युरिटी फी आणि जीएसटीचा समावेश नाही. नागरी उड्डयण मंत्रालयाने मे 2020 मध्ये देशांतर्गत विमान सेवेला परवानगी दिली होती. त्याच वेळी सर्व मार्गाला 7 कॅटेगरीमध्ये विभागण्यात आलं होतं. वर्तमान स्थितीत सर्वच विमान कंपन्यांनी 20 टक्के सीट या किमान आणि कमालच्या सरासरीपेक्षा कमी भाड्यात द्यावी लागतात.
7 कॅटेगरी कुठल्या ?
>> पहिली कॅटेगरी – 40 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 2200 ते 7800 रुपये
>> दुसरी कॅटेगरी – 40 ते 60 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 2800 ते 9800 रुपये
>> तिसरी कॅटेगरी – 60 ते 90 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 3300 ते 11 हजार 700 रुपये
>> चौथी कॅटेगरी – 90 ते 120 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 3900 ते 13 हजार रुपये
>> पाचवी कॅटेगरी – 120 ते 150 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 5 हजार ते 16 हजार 900 रुपये
>> सहावी कॅटेगरी – 150 ते 180 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 6 हजार 100 ते 20 हजार 400 रुपये
>> सातवी कॅटेगरी – 180 ते 210 मिनिटांपर्यंतचा प्रवास – 7 हजार 200 ते 24 हजार 200 रुपये
संबंधित बातम्या :
आता AC थ्री टियर कोचमध्ये मिळणार कन्फर्म तिकीट, करा आरामदायी प्रवास!
Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन रिन्यू करण्यासाठी आता ‘आधार’ गरजेचं
Air travel becomes more expensive, Decision of Ministry of Civil Aviation