नेपाळपेक्षाही येथील विमानप्रवास खतरनाक

नेपाळला झालेल्या विमान अपघातामुळे तेथील हवाई प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना. या छोट्या देशापेक्षाही जास्त विमान अपघात आणखी एका देशात घडत असल्याची आकडेवारी आली आहे. कोणता आहे तो देश पाहूया...

नेपाळपेक्षाही येथील विमानप्रवास खतरनाक
विमानाविषयी 'ते' ट्विट महागात पडले !Image Credit source: airplane
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 1:07 PM

काठमांडू : नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक विमान कोसळून 68 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर या विमानाचा ब्लॅक सापडला आहे. या विमानाच्या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेपाळ सरकारने चौकशी आयोगही नेमला आहे. विमानाचे लँडीग किंवा टेकऑफच्यादृष्टीने नेपाळ जगातला धोकादायक देश मानला जात आहे. परंतू नेपाळपेक्षा आणखी एका देशात सर्वाधिक अपघात घडले आहेत..

नेपाळमध्ये एटीआर-72 हे प्रवासी विमान काठमांडू ते पोखरा या मार्गावर रविवारी कोसळून सर्वच्या सर्व प्रवाशांच्या मृत्यू झाल्याने आता शोधकार्य थांबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या विमानाने रविवारी सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतले होते. काठमांडूहून पोखराकडे येणाऱ्या विमानाला शहरात प्रवेश करण्यापूर्वी काही अंतराआधी अपघात झाला.

गेल्यावर्षीही यति एअरलाईंसच्या विमानाला अपघात झाला होता. त्यातीलही सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. पोखराहून नेपाळच्या जमसम या पर्यटनस्थळावर जाताना खराब हवामानामुळे हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. एव्हीएशन सेफ्टी नेटवर्क डेटाबेसनुसार, गेल्या दशकातील हा 19 वा अपघात आहे. यापैकी दहा अपघात प्राणघातक होते. ज्यामुळे नेपाळ हा विमान प्रवासासाठी धोकादायक देश मानला जाऊ लागला आहे.

2019 मध्ये, नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने स्वतः एक सुरक्षा अहवाल जारी केला, ज्यामध्ये त्यांनी मान्य केले की, देशाची टोपोग्राफी म्हणजे भौगोलिक रचना अशी आहे, की त्यामुळे विमान उडवणे कठीण बनते. संपूर्ण जगातील 14 सर्वोच्च पर्वतांपैकी 8 या छोट्या देशात आहेत. एव्हरेस्ट हा देखील त्यापैकीच एक. जो पर्यटकांना आकर्षित करीत असतो. या जगातील सर्वोच्च पर्वतामुळे हा परिसरात विमान उड्डाणासाठी हा परीसर धोकादायक आहे, येथील हवामान केव्हाही खतरनाक होऊ शकते.

नेपाळ एव्हिएशन पर्वतांच्या ठिकाणी उड्डाण घेण्यालहान विमानांवर अधिक अवलंबून आहे. टेकऑफ आणि लँडिंगसाठी त्यामुळे जास्त जागा लागत नाही. परंतू अपघाताला हेच कारणीभूत ठरू शकते. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 19 सीटर किंवा तत्सम क्षमतेचे विमान लवकर असंतुलित होऊन अपघाताला बळी पडण्याची दाट शक्यता आहे.

नेपाळचे तेनझिंग हिलरी विमानतळ, ज्याला लुक्ला देखील म्हणतात, जगातील सर्वात भयानक विमानतळांमध्ये गणले जाते. बर्फाच्छादित हिमालयातील माउंट एव्हरेस्ट जवळचा हा विमानतळ 9,325 फूट उंचीवर आहे. अतिशय लहान धावपट्टीमुळे येथे फक्त छोटी विमाने उतरू शकतात. त्याच्या एका बाजूला डोंगर आहेत आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या आहेत. त्यामुळेच उत्तर-पूर्व नेपाळमधील या एअरपोर्टला जगातील धोकादायक एअरपोर्ट मानतात.

नेपाळमध्ये इशाऱ्यानंतरही केवळ जुन्या विमानांचा वापर सुरू आहे. खराब हवामानात ते विश्वसनीय नसतात. हे लक्षात घेऊन वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने नेपाळला विमान अपघात रोखण्यासाठी मार्गदर्शन करीत सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही सुरक्षेचे उपाय आणि दर्जेत वाढ झाली असली तरी अपघात मात्र होतच आहेत.

नेपाळ पेक्षाही इंडोनेशिया विमानअपघातात पुढे आहे. एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या डेटानूसार या इंडोनेशियात आतापर्यंत 104 विमान अपघात झाले आहेत. जानेवारी 2021 मध्ये झालेल्या मोठ्या अपघाताच क्रू मेंबर्ससह सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर 2018 मध्येही येथे अशाच अपघातात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इंडोनेशियन विमान वाहतूक उद्योगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत,

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.