UP Elections | अखिलेश यादवांच्या नावे किती संपत्ती? जाणून घ्या बँक बॅलन्स, गाडी बंगला याविषयी सविस्तर!

Akhilesh Yadav Property: अखिलेश यादव यांनी नुकतेच मैनपुर येथील करहल सीट निवडणुक करीता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. चला तर मग जाणून घेऊया दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याजवळ किती प्रॉपर्टी आहे याबद्दल...

UP Elections | अखिलेश यादवांच्या नावे किती संपत्ती? जाणून घ्या बँक बॅलन्स, गाडी बंगला याविषयी सविस्तर!
Akhilesh Yadav
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:14 PM

उत्तर प्रदेश  माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यूपी विधानसभा निवडणूक (UP Assembly Election) मध्ये मैनपुरी येथील करहल सीट साठी निवडणूक लढवत आहेत . नुकतेच अखिलेश यादव यांनी करहल उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिलेश यादव यांनी या प्रतिज्ञापत्र मध्ये पत्नी डिंपल यादव (Akhilesh Yadav Property) यांच्या संपत्तीबद्दलची माहिती दिलेली आहे. अखिलेश यादव यांनी संपत्ती डिटेल्समध्ये आपल्या कार संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही आणि त्याचबरोबर असे सांगितले आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचे लोन सुद्धा घेतले नाहीये सोबतच त्यांनी जिमचे सामान ,जमीन, बँक बॅलन्स बद्दलची माहिती दिलेली आहे. अशातच जाणून घेऊया की अखिलेश यादव आणि पत्नी डिंपल यादव किती संपत्तीचे मालक आहे आणि या संपत्ती मध्ये त्यांच्याजवळ किती रुपयांचे ज्वेलर्स, फोन आणि वेगवेगळे अन्य वस्तू आहेत त्याबद्दल चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या संपत्तीशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट बद्दल..

एकूण संपती

  • अखिलेश यादव आणि डिंपल यादव 40.02 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
  • अखिलेश यादव यांनी प्रतिज्ञा पत्रामध्ये सांगितले आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 8.43 कोटी रुपये जमा आहेत.

प्रॉपर्टी किती आहे?

जर प्रॉपर्टी बद्दल बोलायचे झाल्यास अखिलेश यादव यांच्याकडे 8.43 कोटी आणि डिंपल यांच्याकडे 4.76 कोटी रुपयांची एकंदरीत संपत्ती आहे पूर्ण परिवाराकडे 4.76 कोटी रुपये जंगम एवढी प्रॉपर्टी असून तसेच अखिलेश यांच्याकडे 17.22 इतके कोटी रुपये व डिंपल यांच्याकडे 9.61 कोटी रुपये स्थावर संपत्ती आहे दोघांची एकंदरीत स्थावर संपत्ती 26.83 कोटी रुपये एवढी आहे सोबतच यांच्याकडील या प्रॉपर्टी मध्ये 17.93 एवढी एकर जमीन सुद्धा आहे.

कर्ज किती?

अखिलेश यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितल्यानुसार त्यांच्यावर 28.97 लाख रुपयाचे लोन आहे त्याचबरोबर त्यांच्या पत्नी च्या नावे 14.26 लाख रुपयांचे लोन आहे.

एवढी आहे कमाई

अखिलेश यादव यांची वार्षिक कमाई 83.98 लाख रुपये आहे आणि डिंपल यादव यांची वार्षिक कमाई 58.92 लाख रुपये आहे.

घरात कोणते व किती किंमतीचे सामान?

समाजवादी पार्टीचे प्रमुख यांच्याजवळ 5.34लाख रुपये किमतीचे एक्सरसाइज मशिन आहेत त्याचबरोबर 76,015 इतक्या रुपयाचा किमतीचा फोन आहे तसेच डिम्पल यांच्याकडे 1.25 लाख रुपयेचा कॉम्प्युटर आहे तसेच 2774 ग्रॅम सोने आहे आणि 59,76,687 रुपयांचे डायमंड देखील आहेत.

कार बद्दलची माहिती

जर कार बद्दल बोलायचे झाल्यास या दोघांकडे कोणत्याही प्रकारची कार नाही.

कोणाला किती दिले आहे पैसे?

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार अखिलेश यादव यांनी आपले वडील मुलायमसिंग यादव यांना 2.13 कोटी रुपयाचे लोन दिले आहे आणि डिंपल यादव यांनी त्यांच्या पतीला 8.15 लाख इतके रुपये दिले आहेत.

वर्ष 2019 मध्ये एवढी होती प्रोपर्टी?

अखिलेश यादव यांनी वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणूक दरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मध्ये सांगितले होते की ,अखिलेश यादव यांच्याकडे 3,91,040 रुपये आहे आणि पत्नी डिंपल यादव जवळ 4,03,743 रुपये आहेत. बँक बॅलन्स बद्दल जर बोलायचे झाल्यास त्यांनी प्रतिज्ञापत्र मध्ये 7 सेविंग अकाउंट आणि 2 एफडी अकाउंट असल्याचे नमूद केले आहे. एवढीच या एफडीमध्ये अंदाजे 7 लाख 3 हजार रुपये जमा होते तसेच 6 सेविंग अकाउंट बद्दल बोलायचे झाल्यास या खात्यांमध्ये अंदाजे 5 कोटी 23 लाख रुपये होते तसेच पत्नी डिम्पल यांच्या एफडी अकाउंट मध्ये साधारण 57 लाख रुपये होते याशिवाय डिम्पल यांचे 7 बँक अकाउंट आहेत ज्यात एकंदरीत 2 कोटी 16 लाख रुपये होते.

इतर बातम्या-

Mega block | रेल्वे ट्रॅकवरुन चालत जाण्याची प्रवाशांवर नामुष्की, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल!

IND vs WI: ‘म्हणजे मी आणि धवन संघाबाहेर जाऊ का?’ रोहित शर्मा पहिल्या वनडेआधी असं का म्हणाला?

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.