मोठी बातमी | अयोध्येतलं राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अल् कायदाचं भारतीय मुस्लिमांना ‘हे’ आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही अल कायदाने जहरी वक्तव्य केली आहेत. भारतातल्या मुस्लिमांना जिहादचं समर्थन करण्याचंही आवाहन केलंय.

मोठी बातमी | अयोध्येतलं राम मंदिर उडवून देण्याची धमकी, अल् कायदाचं भारतीय मुस्लिमांना 'हे' आवाहन
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 9:01 AM

नवी दिल्लीः अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं अयोध्येतील राम मंदिर (Ram Temple) कधी उघडणार याची तारीख कालच गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांनी घोषित केली. अन् आज दुसऱ्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्येतील हे राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल कायदा (al Qaeda) या दहशतवादी संघटनेने दिल्याचं वृत्त हाती आलं आहे.

आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनेने गझवा-ए-हिंद या त्यांच्या नियतकालिकात यासंबंधीची धमकी दिली आहे.  या नियतकालिकाच्या ताज्या अंकात अल कायदा ही संघटना अयोध्येतील राम मंदिर तोडून त्या ठिकाणी मस्जिद बांधणार असल्याचं म्हटलं आहे.

तसेच जिहादी समूहाच्या एका ऑनलाइन पत्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओकण्यात आली आहे. भारतातील सर्व मुस्लिमांना या जिहादमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सदर 110 पानांचे नियतकालिक आहे. संपादकीयात म्हटलंय की, ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या ढाच्यावर राम मंदिर बांधण्यात येतंय, ते पाडलं जाईल. मूर्तींच्या जागी अल्लाहच्या नावाने बाबरी मशिद बांधली जाईल. या सगळ्यासाठी बलिदान हवंय.

विशेष म्हणजे या नियतकालिकातील मजकूर हा एखाद्या भारताशी संबंधित व्यक्तीने लिहिला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय

मुस्लिमांना काय आवाहन ?

अल कायदाने भारतीय मुस्लिमाना आवाहन केलंय की, तुम्ही या मुद्द्यात भौतिक नुकसानाला घाबरू नका. अनेक दशकांपासून जीवन आणि संपत्तीचं नुकसान आपण झेललंय. हे जीवन जिहादसाठी वापरलं असतं तर एवढं नुकसान झालं नसतं….

भारतीय मुस्लिमांनी लक्षात ठेवावं… धर्मनिरपेक्षता ही नरकासमान आहे. हिंदु-मुस्लिम भाईचारा हे धोकादायक ठरू शकते.

पत्रिकेत पुढे म्हटलंय, ही केवळ पोकळ चर्चा नाहीये. बाबरी मशीद ३० वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. गुजरातमधील अहमदाबादेत २० वर्षांपूर्वी गर्भवती महिलांना बाळासह पोट कापून जाळण्यात आलं होतं. आज सर्वत्र बुलडोझर चालवण्यात येत आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगडपासून जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) तसेच देवबंद शहरापर्यंत हिंदूंकडून धोका आहे.

हिंदूंना लाठ्या-काठ्या शिकवल्या जातायत-अल कायदा

अलकायदाने पुढे म्हटलंय, सर्वच हिंदूंना लाठ्या-काठ्या शिकवल्या जात आहेत. हिंदू महिलांकडून मुस्लिमांचे चेहरे आणि डोकी छाटण्याची भाषा केली जातेय. अल कायदा या सगळ्याला जिहादने उत्तर देणार आहे. यामुळे संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामी जगाचा भाग बनेल आणि मूर्तीपूजा बंद होईल…

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.