अंबानी यांची सून राधिका मर्चंटने अनेक दिग्गजांना टाकलं मागे, पाहा यादीत मिळवलं कितवं स्थान?
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंट या वर्षी सर्वाधिक चर्चेत राहिली. राधिका मर्चंट ही याच वर्षी अंबानी कुटुंबाची सून बनली. अनंत अंबानी आणि राधिका यांचा विवाह मुंबईत पार पडला. या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली. यावर्षात राधिकाच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड झालाय.
नवीन वर्ष लवकरच सुरु होणार आहे. पण या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. ज्या नेहमी लक्षात राहतील. 2024 या वर्षात बॉलिवूड, राजकारण, क्रीडा आणि व्यवसाय प्रत्येक्ष क्षेत्रासाठी महत्त्वाचं ठरलं. या वर्षी या सर्व क्षेत्रात काहींना काही घडले ज्यामुळे लोकांनी गुगलवर त्यांच्याबद्दल बरेच काही शोधले. असंच काही अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंट यांच्याबाबत ही घडलं आहे. त्यांनी आपल्या नावावर एक विक्रम नोंदवला आहे जो स्वतःच खास आहे.
राधिका मर्चंटसाठी हे वर्ष नक्कीच महत्त्वाचं आहे. कारण अनंत अंबानीसोबत ती विवाहबंधनात अडकली. लग्नाच्या फंक्शन्समुळे ती चर्चेत राहिली. अनंत आणि राधिका यांचं लग्न याच वर्षी १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडले. त्याआधी 1 ते 3 मार्च दरम्यान जामनगरमध्ये या दोघांचे प्री-वेडिंग फंक्शन्स पार पडले होते. ज्यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत, बिझनेस पासून स्पोर्ट्स जगतातील सेलिब्रिटीपर्यंत अनेक मोठी लोकं पोहोचली. यानंतर, त्यांचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन 28 मे ते 1 जून पर्यंत चालला. अशा प्रकारे राधिका मर्चंट वर्षभर प्रसिद्धीच्या झोतात राहिली.
नवीन वर्ष सुरु होण्याआधी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या टॉप 10 व्यक्तींची ही यादी आहे. ज्यामध्ये राधिका मर्चंटने बड्या दिग्गजांना मागे टाकले आहे. या यादीत राधिका मर्चंट 8 व्या क्रमांकावर आहे.
भारतातील Google वर सर्वाधिक शोधली जाणारी 10 व्यक्तिमत्त्वे
1. विनेश फोगट 2. नितीश कुमार ३.चिराग पासवान 4. हार्दिक पंड्या 5. पवन कल्याण 6. शशांक सिंग 7. पूनम पांडे 8. राधिका मर्चंट 9. अभिषेक शर्मा 10. लक्ष्य सेन
View this post on Instagram
याशिवाय गुगलवर या वर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या चित्रपटांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये ‘स्त्री 2’, ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘मिसिंग लेडीज’ या सिनेमांची नावे समाविष्ट आहेत. संजय लीला भन्साळी यांची वेब सीरिज ‘हिरामंडी’ देखील भारतात सर्वाधिक सर्च केलेला शो बनला आहे.