एकदा भाजपला संधी द्या, हैदराबादमधील सगळी बेकायदेशीर कामं हटवू, परत कधी पाणी साचणार नाही : अमित शाह
शाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये पत्रकार परिषदे घेत सत्ताधारी टीआरएस आणि एमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय.
हैदराबाद : देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये पत्रकार परिषदे घेत सत्ताधारी टीआरएस आणि एमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल केलाय. हैदराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली, पाणी साठलं तेव्हा जनता अडचणीत असताना मुख्यमंत्री केसीआर आणि असदुद्दीन ओवेसी कोठे होते? असा सवाल अमित शाह यांनी विचारला आहे. तसेच हैदराबादच्या जनतेने एकदा भाजपला संधी द्यावी, आम्ही हैदराबामधील सर्व बेकायदेशीर बांधकामं हटवू, परत कधी पाणी साचणार नाही, असं आश्वासन शाह यांनी दिलं (Amit Shah criticize TRS and MIM amid Hyderabad Municipal Corporation Election).
अमित शाह म्हणाले, “टीआरएस आणि एमआयएमच्या नेतृत्त्वात जे काम सुरु आहे ते हैदराबादला आंतरराष्ट्रीय आयटी हब बनवण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. नुकतंच हैदराबादमध्ये पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात पाणी साठलं. जवळपास 60 लाख लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मागील 6 वर्षांपासून हैदराबादमधील स्टॉर्म वॉटरच्या एकाही पाईपलाईनची साफसफाई झाली नाही. नाल्यांची सफाई झाली नाही. असं असेल तर हैदराबादमध्ये पाणी साठणार नाही, तर काय होईल?
We will free Hyderabad from the ‘Nizam culture’ and work towards constructing a modern and new city flush with democratic principles. We will take it away from dynastic politics without doing any appeasement: Union Home Minister Amit Shah in Hyderabad pic.twitter.com/jt8AxQemqC
— ANI (@ANI) November 29, 2020
“एमआयएमच्या इशाऱ्यांवर हैदराबादमध्ये बेकायदेशी बांधकामं होतात. यामुळे पाणी निचरा होण्याच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम होऊन अडले गेले आणि पाणी साठलं. हैदराबादमध्ये एकदा भाजपला संधी द्या, आम्ही पाण्याच्या निचरा होण्यात अडथळा ठरणारे सर्व बेकायदेशीर बांधकामं हटवू आणि पुन्हा कधीही हैदराबादमध्ये पाणी साचू देणार नाही,” असंही अमित शाह यांनी सांगितलं.
हैदराबादची जनता अडचणीत होती, तेव्हा मुख्यमंत्री कोठे होते, ओवेसी कोठे होते?
अमित शाह म्हणाले, “हैदराबादमध्ये पाणी साठलं होतं तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री केसीआर आणि ओवैसी कोठे होते? आम्ही देखील माध्यमांना बारकाईने पाहतो, त्यावेळी मुख्यमंत्री केसीआर यांच्या घरासमोरील कॉलनींमध्ये देखील पाणी साठलं होतं. त्यांनी कोठेही दौरा केला नाही. त्यांनी न महानगरपालिकेची बैठक घेतली, न आमदार आणि स्थानिक खासदारांसोबत फिरताना दिसले. हैदराबादची जनता इतक्या मोठ्या अडचणीत होती तेव्हा मुख्यमंत्री कोठे होते, ओवेसी कोठे होते?”
संबंधित बातम्या :
तुमच्या पिढ्या संपतील, पण हैदराबादचे भाग्यनगर होणार नाही, ओवेसींचा आदित्यनाथांना इशारा
‘हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे’, ओवेसींचा गड असलेल्या हैदराबादेत योगी आदित्यनाथांची गर्जना
‘मोदींनाही प्रचाराला आणा, हैदराबादमध्ये तुमच्या किती जागा येतात पाहू’, ओवेसींचं भाजपला आव्हान
संबंधित व्हिडीओ पाहा :
Amit Shah criticize TRS and MIM amid Hyderabad Municipal Corporation Election