अमित शाह करणार सीमावादात मध्यस्थी, बोम्मई आणि शिंदेंशी चर्चा करणार; तिढा सुटणार?
नेहमीप्रमाणे टिकळवाडीतील व्हॅक्सिंग डेपो मैदानावर हा मेळावा होणार आहे. जोपर्यंत बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळत नाही.
नवी दिल्ली: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्यस्थी करणार आहेत. अमित शाह येत्या 14 डिसेंबर रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी सीमावादावर चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज अमित शाह यांची भेट घेऊन कर्नाटक सरकारच्या अरेरावीकडे शाह यांचं लक्ष वेधलं. त्यावर शाह यांनी हे आश्वासन दिल्याचं कोल्हे यांनी सांगितलं.
सीमा प्रश्नावर समन्वयातून मार्ग काढला जावा. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असं असताना कर्नाटक सरकारकडून हेकेखोरपणा केला जात आहे. त्यामुळे अमित शाह मध्यस्थी करताना कर्नाटक सरकारच्या अडेलट्टूपणावरही चर्चा करतील असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.
दरम्यान, कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येथे 19 डिसेंबरपासून बेळगाव येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या निषेधार्थ त्याच दिवशी समांतर असा मराठी भाषिकांचा महामेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित केला जाणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षास सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मेळाव्यासाठी निमंत्रण करण्यात आले आहे
बेळगावात ज्या ज्या वेळी कर्नाटक सरकारकडून हिवाळी अधिवेशन घेतले जाते त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करत असते. अधिवेशनाला विरोध म्हणून हा मेळावा होत असतो. यावर्षी देखील हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचा आयोजन केले आहे.
त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून परवानगीसाठी अर्ज देखील केला आहे. या महामेळासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्र सरकारसह सर्व राजकीय पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. महामेळाव्याच्या दिवशी शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपा या सर्व पक्षांना आपले दोन प्रतिनिधी महामेळाव्यासाठी दोन प्रतिनिधी पाठवण्याबाबतचं पत्रं मध्यवर्ती महाराष्ट्रकीकरण समितीने सर्वच राजकीय पक्षांना धाडले आहे
नेहमीप्रमाणे टिकळवाडीतील व्हॅक्सिंग डेपो मैदानावर हा मेळावा होणार आहे. जोपर्यंत बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळत नाही. जोपर्यंत अन्याय होणं थांबत नाही तोपर्यंत अधिवेशनाच्या दिवशी सरकार विरोधात महावेळाव्याचं आयोजन करण्याचा निर्धार समितीने केला आहे. त्यानुसार हा मेळावा होत आहे.