जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही, मेहबुबा मुफ्तींचे वक्तव्य, भाजपची अटकेची मागणी
" उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या यांच्या देशद्रोही वक्तव्याची दखल घेऊन त्यांना अटक करावी", अशी मागण रैना यांनी केली आहे. (Jammu Kashmir BJP demanded Mehbooba Mufti Should be arrested for statement on Indian Flag)

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भारतीय झेंड्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी जम्मू काश्मीर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी उपराज्यपालांकडे केली आहे. “उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या देशद्रोही वक्तव्याची दखल घेऊन त्यांना अटक करावी”, अशी मागणी रैना यांनी केली आहे. (Jammu Kashmir BJP demanded Mehbooba Mufti Should be arrested for statement on Indian Flag)
“काश्मीरच्या जनतेला भडकावण्याचे काम मेहबुबा मुफ्ती यांच्या सारख्या नेत्यांनी करु नये. येथील शांतता आणि बंधुभावाला तडा जावू देणार नाही. जर काही चुकीचे घडले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील” असा इशारा भाजप नेते रवींद्र रैना यांनी दिला.
मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. “जोपर्यंत जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही” ,असं वक्तव्य मुफ्ती यांनी केले होते.श्रीनगर मधील गुपकर रोडवरील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मेहबुबा मुफ्ती पीडीपीचा झेंडा आणि जम्मू काश्मीरचा ध्वज घेऊन सहभागी झाल्या होत्या.
दिल्लीमध्येही तक्रार दाखल
मेहबुबा मुफ्ती यांच्या विरोधात राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विनीत जिंदल या वकिलाने मेहबुबा यांच्या विरोधात राष्ट्रीय सन्मान कायदा आणि आयपीसी कलम 121, 151, 153अे, 295, 298, 504, 505 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी निर्वाचित सरकारविरोधात लोकांना भडकवण्याचे काम केले आहे.या सोबत राष्ट्रध्वजाचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
‘कलम 370 हटवणे हा काश्मीरसाठी काळा दिवस’, सुटकेनंतर मेहबुबा मुफ्ती यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Article 370 : मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक, तणावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
(Jammu Kashmir BJP demanded Mehbooba Mufti Should be arrested for statement on Indian Flag)