Jharkhand : झारखंडमधील रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांची तासाभरात सुटका, हेलिकॉप्टरमधून एक तरूण पडला
झारखंडमधील (Jharkhand) देवघर (Deoghar) जिल्ह्यात त्रिकूट येथे दोन रोपवेमध्ये (Ropeway) टक्कर झाल्यानंतर दहा एप्रिलपासून लोक अडकली आहेत. आज हा तिसरा दिवस आहे. 40 तास झाले लोक रोपवेमध्ये अडकली आहेत. त्यांना अपघात झाल्यापासून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली – झारखंडमधील (Jharkhand) देवघर (Deoghar) जिल्ह्यात त्रिकूट येथे दोन रोपवेमध्ये (Ropeway) टक्कर झाल्यानंतर दहा एप्रिलपासून लोक अडकली आहेत. आज हा तिसरा दिवस आहे. 40 तास झाले लोक रोपवेमध्ये अडकली आहेत. त्यांना अपघात झाल्यापासून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या जवानांना बचावकार्य करताना अडचण येत असल्याने अद्याप सगळ्यांना बाहेर काढता आलेलं नाही. आज एका तरूणाची रोपवेमधून सुटका करीत असताना तो हेलिकॉप्टरमधून खाली पडला. तरूण खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या रोपवेशी धडक झाली आहे. त्यावेळी रोपवेमध्ये हवेत 48 लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. रोपवेच्या धडकेत आठ लोकं अगदी गंभीर रित्या जखमी झाले होते.
36 लोकांना सुखरूप बाहेर काढलं
सकाळपासून रोपवेतील अनेक लोकांना बाहेर सुखरूप काढण्यात जवानांना यश आले आहे. त्यामध्ये 5 पुरूष, 3 महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अजून सुध्दा काही लोक अडकले आहेत. त्यांना तासाभरात बाहेर काढले जाणार आहे. रेस्क्यू टीमचे प्रमुख अश्विनी नायर यांनी सगळ्यांना दुपारपर्यंत बाहेर काढू असं सांगितलं आहे. लोकांना बाहेर काढण्याचं सध्या सुरू आहे. अपघातबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आदेश दिले आहेत. आत्तापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. तसेच केबलच्या कारणामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 36 लोकांना सुखरूप बाहेर काढलं आहे. मागच्या ४० तासात अडकलेल्या अथक प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले आहे.
हेलिकॉप्टरमधून तरूण पडल्यानंतर बचावकार्य थांबवलं होतं
रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी अनेक लोकं तिथं गेली होती. त्यावेळी हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यांनतर तात्काळ तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीन बचावकार्य सुरु कऱण्यात आलं. परंतु एका तरूणाला रोपवेमधून बाहेर काढत असताना तो खाली पडला. जंगल आणि पुर्णपणे दगडाचा परिसर असल्याने अडकलेली लोक पुर्णपणे भयभीत झाली होती. सध्या फक्त आठ लोक अडकलेली आहेत. त्यांना तासाभरात बाहेर काढण्यात येईल असं एनडीआरएफच्या जवानांनी सांगितलं आहे.