AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयआयटीच्या विद्यार्थ्याची कमाल, बनविला सिगारेटचे व्यसन सोडणारा जगातला पहिला फिल्टर

आयआयटीच्या या स्टुडन्टला तो साल 2018 मध्ये सिनेमाघरात चित्रपट पहाण्यासाठी गेला असता धुम्रपान बंदी संबंधी सूचना पाहिल्यानंतर या फिल्टरची कल्पना सूचली..

आयआयटीच्या विद्यार्थ्याची कमाल, बनविला सिगारेटचे व्यसन सोडणारा जगातला पहिला फिल्टर
Cigibud Cigarette FilterImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 22, 2023 | 8:13 PM
Share

मुंबई : तुम्हाला जर सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आयआयटी दिल्लीच्या ( DELHI IIT ) माजी विद्यार्थ्याने जगातला पहिला सिगारेट्चे व्यसन सोडायला मदत करणारा अनोखा फिल्टर ( FILTER ) बनवला आहे, या फिल्टरची सध्या खूपच चर्चा होत आहे. हा सिगारेटचा ( Cigarette )  फिल्टर खूपच लाभदायक ठरणार आहे. यामुळे आरोग्याच्या रक्षणाबरोबरच सिगारेटची ही वाईट सवय सुटायला मदत करणार आहे. कशी ते पाहूयात…

तु्म्हाला जर सिगारेटचे व्यसन सोडायचे आहे. परंतू इच्छा असूनही ते सुटत नसेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. दिल्ली आयआयटीचा माजी विद्यार्थी प्रतीक शर्मा याने सिगारेट्स पिणाऱ्यासाठी एक वेगळ्या धाटणीचा सिगारेट्स फिल्टर विकसित केला आहे. दिल्ली आयआयटीतून 2015  साली ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे प्रतिक शर्मा यांनी जगातला पहिला असा फिल्टर तयार केल्याचा दावा केला आहे जो सिगारेटची सवय सोडायला मदत करणार आहे.

या सिगारेट्स फिल्टरचे नाव ‘सिगीबड’ असे ठेवण्यात आले असून बुधवारपासून तो बाजारात उपलब्ध झाला आहे. ‘सिगीबड’ तुमचे सिगारेटचे व्यसन सोडण्यास मदत करणार आहे, तसेच हा फिल्टर तुमच्या सिगारेटसची चव कोणत्याही स्वरूपात न बदलता तुमच्या शरीरात जाणारे 80 टक्के निकोटीन फिल्टर करून रोखणार आहे.

स्टार्टअप नॅशनल अवार्ड

आयआयटीचा अभ्यास करताना प्रतीक शर्माने आपल्या प्रोफेसरांच्या मदतीने नॅनोफायबर टेक्नोलॉजी विकसित करून त्याचे पेटंट घेतले होते. त्यांनी या तंत्रावर आधारीत उत्पादने बनवित त्यांना बाजारात उतरविले होते. शर्मा यांना याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते साल 2017  मध्ये स्टार्टअप नॅशनल अॅवार्ड मिळाले होते.

63 टक्के लोकांना व्यसन सोडायचे असते

प्रतिक शर्मा यांनी म्हटले आहे की नासोफिल्टर, नॅनोक्लीन पॉल्यूशन नेट आणि मासोमास्क आदी उत्पादनांवर काम करताना हे तंत्र आपण धुम्रपान सोडण्यासाठी वापरण्याचे ठरविले. एका सर्वेक्षणात 63 टक्के धुम्रपान करणाऱ्यांना हे व्यसन सोडायचे असते. परंतू निकोटीनच्या नशेमुळे ते असे करू शकत नाही, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते केवळ चार टक्के लोकच हे व्यसन सोडण्यात यशस्वी होतात.

किती आहे किंमत

सिगीबडच्या प्रत्येक पाकिटात 30 फिल्टर असतील, त्याची किंमत 350 रूपये असेल. प्रत्येक फिल्टरचा एकदाच वापर करणे योग्य ठरेल, परंतू तरीही तीन वेळा ते वापरता येईल. त्यानंतर ते बिनउपयोगी ठरेल. सिगारेट बनविणाऱ्यांना कंपन्यांना ते बायो सेफ सिगारेट फिल्टर बनविण्याचे तंत्र देण्यासही ते तयार आहेत. सिगारेटची थोटकं फेकल्याने समुद्राचे प्रदुषण वाढण्याचे एक कारण आहे. आमचे तंत्र बायो-सेफ फिल्टर बनविण्यास मदत करू शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.