Agneepath Scheme: अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे आनंद महिंद्रा दुःखी! ट्विट करत व्यक्त केला योजनेवरील विश्वास

सैन्यदलातील सर्व नवीन भरतींसाठी प्रवेशाचे वय 17.5 ते 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, विरोधानंतर केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत ही भरती करणे शक्य नसल्याने अग्निवीरांच्या भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा 2022च्या भरती चक्रासाठी 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याची घोषणा केली.

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे आनंद महिंद्रा दुःखी! ट्विट करत व्यक्त केला योजनेवरील विश्वास
Anand Mahindra tweet ViralImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 8:31 AM

नवी दिल्ली:अग्निपथ योजने (Agneepath Scheme) मुळे झालेल्या हिंसाचारामुळे दु:ख झाले आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेची घोषणा करण्यात आली, तेव्हा मी म्हणालो होता आणि आताही मी पुन्हा तेच सांगतो की या योजनेअंतर्गत अग्निवीरांना मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्यांना रोजगारक्षम बनवतील. महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांची भरती करण्याच्या संधीचे स्वागत करतो.” हे ट्विट केलंय महिंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी या योजनेचं स्वागत केलंय आणि योजनेनं तरुणांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

आनंद महिंद्रांनी आज, सोमवारी सकाळी केलेलं ट्विट

सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान

भारतीय तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलाच्या नियमित संवर्गात सेवा देण्याची मुभा देणाऱ्या अग्निपथ योजनेची घोषणा १४ जून रोजी करण्यात आल्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंड, आसामसह विविध राज्यांमध्ये निदर्शने सुरू झाली. काही ठिकाणी आंदोलन तीव्र होताच निदर्शकांनी गाड्यांना आग लावणे, वाहने जाळणे आणि खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे या दोन्ही गोष्टींचा भडिमार केला.

यंदा एकूण 46 हजार अग्निवीरांची भरती

यंदा एकूण 46 हजार अग्निवीरांची भरती होणार आहे, पण नजीकच्या काळात ती 1.25 लाखांवर जाईल, असे एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. सैन्यदलातील सर्व नवीन भरतींसाठी प्रवेशाचे वय 17.5 ते 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, विरोधानंतर केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत ही भरती करणे शक्य नसल्याने अग्निवीरांच्या भरतीसाठीची कमाल वयोमर्यादा 2022च्या भरती चक्रासाठी 21 वर्षांवरून 23 वर्षे करण्याची घोषणा केली.

भरती धोरण वादग्रस्त- काँग्रेस

‘अग्निपथ’ योजनेमुळे तरुणांना संरक्षण व्यवस्थेत सामील होण्याची आणि देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळते, याकडे सरकार लक्ष वेधत असले, तरी काँग्रेसने म्हटले होते की, भरती धोरण वादग्रस्त आहे, अनेक धोके पत्करणारे आहे, सैन्यदलांच्या दीर्घकालीन परंपरा आणि आचारविचारांना धक्का पोहोचवते आणि या योजनेअंतर्गत भरती झालेले सैनिक देशाच्या संरक्षणासाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षित आणि प्रेरित होतील याची शाश्वती नाही.

प्रशिक्षण कालावधीसह 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी नोंदणी

अग्निवीरांना प्रशिक्षण कालावधीसह 4 वर्षांच्या सेवा कालावधीसाठी नोंदणी केली जाईल. चार वर्षांनंतर केवळ 25 टक्के अग्निवीरांना गुणवत्ता, इच्छा आणि वैद्यकीय तंदुरुस्तीच्या आधारे नियमित संवर्गात कायम ठेवले जाईल किंवा त्यांची पुन्हा नेमणूक केली जाईल. त्यानंतर हे 25 टक्के अग्निवीर आणखी 15 वर्षांच्या पूर्ण मुदतीसाठी काम करतील.

योजना मागे घेतली जाणार नाही

हा विरोध सुरू असतानाच लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी ही योजना मागे घेतली जाणार नाही, असे स्पष्ट केले आणि ‘देशाला तरुण करण्यासाठी उचललेले हे एकमेव पुरोगामी पाऊल आहे’, असे सांगितले.या योजनेवर आज सकाळी (सोमवार २० जून २०२२) आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलंय. हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.