Anand Mahindra Tweet: उद्योजक आनंद महिंद्रा यांचा पहिल्यांदाच ट्ववीट करुन नितीन गडकरी यांना सवाल
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी गर्द झाडीतील त्या रस्त्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आणि नितीन गडकरी यांना सवाल केल्याबद्दल त्यांना अनेक जणांनी रिट्विटही केले आहे. तर अनेक जणांनी त्यांच्या या गोष्टीचे समर्थन केले आहे.
मुंबईः भारतातील मोठे उद्योजक म्हणून ओळख असलेले आनंद महिंद्रा (Businessman Anand Mahindra) हे त्यांच्या ट्विटमुळेही (Tweet)नेहमीच चर्चेत असताता. कधी ग्रामीण भारतात असलेले टॅलेंट आपल्या ट्विटच्या माध्यमातून जगासमोर आणतात तर कधी त्यांना देशातील कानाकोपऱ्यातील समस्या गंभीर वाटते आणि ते ती समस्या मग जगासमोर आपल्या माध्ममातून मांडतात तर कधी कोणाचा व्हिडीओ शेअर करत त्याची गोष्ट ती इतरांना सांगतात. त्यामुळे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन म्हणून आनंद महिंद्रा यांची ओळख असली तरी त्यांच्या या गोष्टीमुळेही ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. आताही त्यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एक गर्द झाडीतील रस्त्याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Road Transport and Highways Minister Nitin Gadkari) .यांनाच थेट सवाल केला आहे. आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून Cosmic Gaia या ट्विटर हँडलवरून केलेला व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधकाम विभागाचे मंत्री असल्याने आणि त्यांनी देशात राबवत असलेल्या रस्ते योजनांमुळे आनंद महिंद्रा यांनी त्या व्हिडीओतील रस्त्याप्रमाणे गर्दा झाडीतील बोगद्याप्रमाणे मला निश्चित बोगदे आवडतात पण खरे सांगायचे तर, मला या प्रकारच्या म्हणजे गर्द झाडीतून जाणारे रस्ते मला अधिक आवडतात असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.
I like tunnels, but frankly, I’d much rather go through this kind of ‘Trunnel’ …@nitin_gadkari ji, can we plan to purposefully plant some of these trunnels on the new rural roads you are building? https://t.co/6cE4njjGGi
— anand mahindra (@anandmahindra) August 27, 2022
त्यामुळे नितीन गडकरी यांना त्यावरुन सवाल करत म्हणतात की, ग्रामीण भागात तुम्ही बांधत असलेल्या रस्त्यांवर असे काही नियोजन करु शकता का असा सवाल त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केला आहे.
गर्द झाडीतील सुंदर प्रवास
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी गर्द झाडीतील त्या रस्त्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आणि नितीन गडकरी यांना सवाल केल्याबद्दल त्यांना अनेक जणांनी रिट्विटही केले आहे. तर अनेक जणांनी त्यांच्या या गोष्टीचे समर्थन केले आहे.
असेही रस्ते निर्माण होतात…
आनंद महिंद्रांचे अनेक व्हिडीओ हे विकासाच्या मुद्यावर नेहमीच बोलत असतात, कधी त्यांच्या ट्विट मधून सवाल असतो तर कधी कोणत्या तरी गोष्टीवर उत्तरही असतं त्यामुळे देशात होत असलेल्या रस्ता बांधकामाचे कामाबद्दल अनेक वेळा पर्यावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ म्हणजे रस्त्यांसाठी होत असलेली वृक्ष तोडीवर सवाल उपस्थित केला आहे. कारण सध्या अनेक नवनव्या महामार्गांसाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे काम थांबणं, मार्ग बदलणे, वन विभागाचा प्रश्न उपस्थित होणे अशा समस्या निर्माण होत असतानाच आनंद महिंद्रांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधकाम विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांना गर्द झाडीतील आणि झाडांच्या बोगद्यातून प्रवास करायला मला आवडेल असंही ते सांगतात.