AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस कॅनॉलमध्ये पलटी होताना जोराचा आवाज झाला, 35 प्रवाशांनी सांगितलं कारण

Andhra Pradesh Road Accident : आज सकाळी लग्न समारंभासाठी निघालेली एक बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. त्यामध्ये सात जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस कॅनॉलमध्ये पलटी होताना जोराचा आवाज झाला, 35 प्रवाशांनी सांगितलं कारण
Andhra Pradesh Road AccidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2023 | 11:25 AM
Share

मुंबई : लग्नासाठी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. त्यामध्ये सात लोकांचा जागीचं मृत्यू झाला आहे. झालेल्या अपघातामध्ये १२ जण गंभीर जखमी असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचा सुध्दा समावेश आहे. हा अपघात आज सकाळच्या सुमारास तड़के दर्शी परिसरात झाला आहे. बसमधील सगळी लोकं पोडिली काकीनाडा येथे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघाले होते. त्या बसमध्ये ३५ प्रवासी होते. चालकाचं गाडीवरील नियंत्रण बिघडलं, आणि बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन (Andhra Pradesh Police) तिथं दाखल झाले आहे. हा अपघात आंध्रप्रदेश (Andhra Pradesh Road Accident) राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात झाला आहे.

लग्नात जाण्यासाठी भाड्याने गाडी घेतली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नात जाण्यासाठी लोकांनी प्रवासासाठी सरकारी मालकीची आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) बस भाड्याने घेतली होती. गाडी सुरु असताना चालकाला झोप लागली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. अब्दुल अजीज (65), अब्दुल हानी (60), शेख रमीज (48), मुल्ला नूरजहां (58), मुल्ला जानी बेगम (65), शेख शबीना (35) आणि शेख हिना (6) यांचा मृ्त्यू झाला आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले…

हा अपघात सकाळी झाल्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णांना तातडीने मदत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील लोकांनी सुध्दा सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे.

मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांवरती उपचार सुरु आहेत.

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.