अनिल अंबानी कंगाल; वकिलाला फी देण्यासाठी दागिनेही विकले!
अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून, त्यांनी घरातील दागिने विकल्याचं सांगितलं आहे. (Anil Ambani sold jewellery to pay legal fee)
नवी दिल्ली : देशातील श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे उद्याेजक अनिल अंबानी (Anil Ambani) यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याचं समोर आलं आहे. वकिलाला फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती अंबानी यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे. (Anil Ambani sold jewellery to pay legal fee)
अनिल अंबानी यांच्याकडून 5281 करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी दागिने विकल्याची माहिती न्यायालयाला दिली.
अनिल अंबानी यांनी 9.9 करोड रुपयांचे दागिने विकले
अंबानी यांनी न्यायालयामध्ये म्हटलंय, की “जानेवारी ते जून 2020 दरम्यान मी 9.9 करोड रुपयांचे दागिने विकले. आता माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू नाही.” तसेच आपल्याकडे महागड्या गाड्याही नसल्याचा दावाही त्यांनी केल्याचा सूत्रांनी सांगितलं. माझ्याकडे रोल्स रॉयल्स कार नसून, मी साधी कार वापरतो, असंही त्यांनी सांगितलं आहे.
Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात
खात्यात फक्त 20.8 लाख रुपये
अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2019 ला त्यांच्या खात्यात 40.2 लाख रुपये होते. तर 1 जानेवारी 2020 ला त्यांच्याकडे फक्त 20.8 लाख रुपये शिल्लक राहिले.
दरम्यान, अंबानी (Anil D Ambani) यांनी “माझ्याकडे आता कमाईचे दुसरे कोणतेही साधन नाही. माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीयच माझा सर्व खर्च उचलतात.” असही त्यांनी कोर्टाला सांगितलं. त्यामुळे धनाढ्य उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे अनिल अंबानी यांच्यावर दागिने विकायची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी शक्य तितक्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याचं चिनी बँकांनी म्हटलंय
अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचं एकूण 12,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. अंबानी 2008 मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपने येस बँकेचं 2,892 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई) 21,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा येस बँकेने जुलै महिन्यात घेतलेला आहे.
संबंधित बातम्या :
Yes Bank | कर्ज फेडण्यास असमर्थ, Yes बँकेकडून अनिल अंबानी ग्रुपचं मुख्यालय टेकओव्हर
Yes Bank | ‘रिलायन्स समुहा’चे अध्यक्ष अनिल अंबानींना ‘ईडी’चे समन्स
रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीच्या मार्गावर, अनिल अंबानींचा संचालक पदाचा
कर्ज फेडण्यासाठी उद्योगपती अनिल अंबानी मुख्यालय विकणार
(Anil Ambani sold jewellery to pay legal fee)