पाकिस्तानात गेलेल्या अंजू हिने इस्लाम धर्म स्वीकारला का? समोर आलं असं काही…! पाहा Video

सीमा हैदर आणि अंजू ही दोन प्रकरणं सध्या गाजत आहेत. आता पाकिस्ताना गेलेल्या अंजू आणि नसरुल्लाह यांनी निकाह केला असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे. याबाबत काही व्हिडीओ समोर आले आहेत.

पाकिस्तानात गेलेल्या अंजू हिने इस्लाम धर्म स्वीकारला का? समोर आलं असं काही...! पाहा Video
अंजूने पाकिस्तानात जाऊन नसरूल्लाह याच्यासोबत केला निकाह! आता ते Video आले समोर
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 11:44 AM

नवी दिल्ली : राजस्थानच्या अलवरमध्ये राहणारी अंजू प्रियकर नसरुल्लाह भेटण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहे. या दरम्यान तिने समोर येत मी फक्त भेटायला आली असून भारतात परतणार असल्याचं सांगितलं होतं. पण आता वेगळीच माहिती समोर येत आहे. अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला असून नसरूल्लाहसोबत निकाह केला आहे, असं बोललं जात आहे. मात्र तिने वारंवार इस्लाम धर्म स्वीकारला नसल्याचं सांगितलं आहे. असं असताना तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अंजू पाकिस्तानात खूश असल्याचं नव्या व्हिडीओतून दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अंजू आपल्या प्रियकर नसरुल्लाहसोबत खैबर पख्तूनख्वामच्या खोऱ्यात फिरताना दिसत आहे. दोघं एकमेकांच्या हातात हात घालून खोऱ्यात फिरत आहेत. हा व्हिडीओ पाहून प्री वेडिंग शूट असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

अंजू पाकिस्तानात कशी गेली?

राजस्थानच्या अलवरमध्ये राहणारी अंजू पाकिस्तानात कशी गेली? याबाबतही चर्चा रंगली आहे. नसरुल्लाह आणि अंजूची ओळख फेसबूकवरून झाली होती. त्यानंतर त्यांची घट्ट मैत्री झाली आणि त्याला भेटण्यासाठी ती पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात पोहोचली. अंजू वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात दाखल झाली होती. या दरम्यान अंजूने एक रील तयार केला होता. यात पाकिस्तानात कशी आली याबाबत सांगितलं आहे.

अंजूने सांगितलं की, “मी अधिकृतरित्या पाकिस्तानात आली आहे. हे काही एक दोन दिवसांचं प्रकरण नाही. पूर्ण प्लानिंगनुसार पाकिस्तानात आली आहे. फेसबुकवरून माझी मैत्री नसरुल्लाहसोबत झाली होती. त्याला भेटण्यासाठी पाकिस्तानात आली आहे.” अंजू 20 ऑगस्टला भारतात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नव्या व्हिडीओत काय आहे?

अंजूने पाकिस्तानात फक्त मित्राला भेटण्यासाठी गेल्याचा दावा केला आहे. तसेच निकाह केल्याची कबुली अजूनही दोघांनी दिलेली नाही. पण नव्या व्हिडीओत वेगळंच चित्र दिसत आहे. ती नसरुल्लाहसोबत फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहता प्री वेडिंग शूट असल्याच अंदाज बांधला जात आहे. कारण हा व्हिडीओ ड्रोनच्या माध्यमातून शूट केला आहे. यात अंजू आणि नसरूल्लाह एकदम खेटून बसल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे शूट केला आहे.

नसरुल्लाह अंजूसाठी भारतात येण्यास तयार

अंजू आणि नसरूल्लाह यांची फेसबुकवर मैत्री झाली. यानंतर तिने आपल्या कुटुंबाला अंधारात ठेवून नसरूल्लाह भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली. नसरुल्लाह पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वाच्या दीर जिल्ह्यात राहणारी आहे. अंजूचा विजा 20 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे तिला भारतात परत यावं लागणार आहे. अंजू आणि नसरूल्लाह यांची ओळख 2019 साली फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. आता नसरूल्लाह अंजूसाठी भारतात येण्यास तयार आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.