प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं

प्रियकराने प्रेमात धोका देत दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने संतप्त झालेल्या प्रेयसीने नववधूवर हल्ला केला.

प्रियकराच्या लग्नामुळे प्रेयसीचा संताप, नववधूचे केस कापले, डोळ्यात फेविक्वीक ओतलं
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 12:06 PM

पाटणा : प्रियकराने प्रेमात विश्वासघात करत दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने (Girlfriend Attack On Bride) संतप्त झालेल्या प्रेयसीने नववधूवर हल्ला केला. तिने नवरीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांमध्ये फेविक्वीक ओतलं. त्यामुळे पीडित नवरी तिची दृष्टी गमावण्याची भीती आहे. बिहारच्या नालंदा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी उप विभागीय पोलीस अधिकारी मोहम्मद शिब्ली नोमानी यांनी माहिती दिली (Girlfriend Attack On Bride).

प्रियकराच्या लग्नाने प्रेयसी नाराज

प्रियकर गोपाल रामने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं म्हणून प्रेयसी नाराज होती. ती गोपालच्या बहिणीची मैत्रिणही होती. गोपालचं 1 डिसेंबरला शेखपुरा जिल्ह्यात लग्न झालं. त्यानंतर तो पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत मोरा तलाव गाव येथील आपल्या घरी परतला.

गोपालच्या लग्नाने संतप्त प्रेयसी बहिणीची मैत्रिण म्हणून त्याच्या घरात आली. कुटुंबातील सदस्य झोपले असताना तिने नववधूच्या खोलीत प्रवेश केला. त्यानंतर तिने नवरीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यात फेविक्वीक ओचलं (Girlfriend Attack On Bride).

प्रेयसीला रात्रभर बांधून मारहाण

डोळ्यात फेविक्वीक टाकताच नवरीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पीडित नवरी वेदनेने तडफडू लागली. यानंतर प्रेयसीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबातील लोकांनी तिला पकडल. तिला रात्रभर बांधून ठेवलं आणि मारहाण केली. पोलिसांना याबाबतची माहिती कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं. त्यानंतर कुटुंबियांनी प्रेयसीला पोलिसांना सोपवलं.

“या हल्ल्यात पीडित नववधू गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बिहारच्या शरीफ येथील सदर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या डोळ्यात फेविक्वीक टाकल्याने कदाचित ती तिची दृष्टी गमावू शकते. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच नालंदाचे पोलीस उपअधीक्षक संजय कुमार हे देखील घटनास्थळी पोहोचले. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली.

या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Girlfriend Attack On Bride

संबंधित बातम्या :

ऑनलाईन लग्न जुळलं, पण नवरदेव आधीच विवाहित, तरुणीला फसवणारा दीड वर्षानंतर गजाआड

बंगालमधून फसवून आणून चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय, दोन मुलींची थरारक सुटका

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.