Marathi News National Another blow to BJP in West Bengal, disgruntled MP Arjun Singh returns to Trinamool. 5 big leaders leave BJP in 11 months
प. बंगालमध्ये भाजपाला आणखी एक धक्का, नाराज खासदार अर्जुन सिंह तृणमूलमध्ये परतले. 11 महिन्यांत 5 मोठ्या नेत्यांची भाजपाला सोडचिठ्ठी
२०१९ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि बरैकपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी बंगालच्या भाटपारा विधानसभा मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. गेल्या ११ महिन्यात भाजपातून ५ मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
कोलकाता – प. बंगाल (West Bangal)विधानसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP)पराभव झाल्यानंतर, आता राज्यात ममता यांच्या तृणमूल काँग्रेसकडे राजकीय (Trinmool congress)नेते परतताना दिसत आहेत. प. बंगालच्या बरैकपूरचे भाजपा खासदार अर्जुन सिंह यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. अर्जुन सिंह हे प. बंगाल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. २०१९ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आणि बरैकपूर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी बंगालच्या भाटपारा विधानसभा मतदारसंघातून ते ४ वेळा आमदार राहिलेले आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. गेल्या ११ महिन्यात भाजपातून ५ मोठ्या नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
BJP Lok Sabha MP Arjun Singh joins TMC in the presence of party’s general secretary Abhishek Banerjee in Kolkata pic.twitter.com/gDVL5XiHGG
एसी खोल्यांत बसून राजकारण केले जात नाही. त्यासाठी जनतेत जावे लागते आणि त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागतो. त्यासाठी भाजपाला प्रयत्न करण्याची गरज आहे. भाजपात इतरांना जबाबदार धरण्यात येते. भाजपात असलेल्या दोन तृणमूलच्या खासदारांनीही राजीनामे देऊन परतावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अर्जुन सिंह नाराज
पक्षात गेल्या सहा महिन्यांपासून महत्त्व कमी करण्यात आल्याने अर्जूनसिंह नाराज होते. तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांच्या भेटीनंतर पक्षश्रेष्ठी सक्रिय झाले, मात्र त्यांचे फोन अर्जुन सिंह घेत नव्हते, अशी माहिती आहे.
खासदारकीचा राजीनामा देणार नाही
पक्ष बदलला असला तरी लगेच खासदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपातील दोन तृणमूलमुलच्या खासदारांनी राजीनामा दिला की आपणही त्यांच्यासोबतच राजीनामा देऊ असे त्यांनी सांगितले आहे. तृणमूलचे शिशिर अधिकारी आणि सुनील मंडल या तृणमूलच्या दोन खासदारांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता, मात्र त्यांनीही पदाचा राजीनामा दिलेला नाही. तूर्तास हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांकडे आहे.
गेल्या ११ महिन्यांत ५ मोठ्या नेत्यांचा भाजपाला रामराम
बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सफलता मिळाली नाही, त्यानंतर जून २०२१ मध्ये मुकुल रॉय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. त्यावंतर राजीव बॅनर्जी, बाबुल सुप्रियो आणि विश्वजीत दास या बड्या नेत्यांनीही रामराम ठोकला. सध्या बॅनर्जी हे त्रिपुराचे प्रभारी आहेत तर बाबुल सुप्रियो आमदार झाले आहेत.