चेहरा झाकून अयोध्येतील राम मंदिरात पोहचला हा दिग्गज, त्यानंतर ओळखला गेला अन्…

Ram Mandir Anupam Kher | अयोध्येतील राम मंदिरात दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटीज आणि दिग्गज येत आहेत. भक्तांची गर्दी रोज वाढत आहे. भक्तांच्या गर्दीमुळे राम मंदिर ट्रेस्टने मंदिराची आरती आणि दर्शनाची वेळ बदलली आहे.

चेहरा झाकून अयोध्येतील राम मंदिरात पोहचला हा दिग्गज, त्यानंतर ओळखला गेला अन्...
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 3:34 PM

अयोध्या, दि.27 जानेवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिर आता सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे. त्यानंतर राम मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. राम मंदिरात दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटीज आणि दिग्गज येत आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अमिताभ बच्चनसह अनेक बॉलीवूड कलाकार आले होते. बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दर्शनासाठी गेले. यावेळी गर्दीत आपण ओळखले जाऊ नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली होती. चेहरा पूर्ण झाकून ते दर्शनाच्या गर्दीत सहभागी झाले. त्यानंतर लोकांनी त्यांना ओळखले.

सोशल मीडियावर व्हिडिओ

अनुपम खेर यांनी स्वत: सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कृपया शेवटपर्यंत पाहा. काल मी आमंत्रित पाहुणे म्हणून राम मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. आज पुन्हा मंदिर जाण्याचा मोह झाला. त्यानंतर राम मंदिरात भक्तीचा समुद्र पाहण्यास मिळाला. हे सर्व पाहून माझे ह्रदय गदगद झाले. लोकांचा भगवान राम यांना पाहण्याचा उत्साह आणि भक्तीभाव दिसून आला. मी जेव्हा निघायला लागलो तेव्हा एक रामभक्त माझ्या कानात बोलला. ‘भैया जी मुंह ढकने से कुछ नहीं होगा! रामलला ने पहचान लिया!’

अनुपम खेर अजूनही सक्रीय

अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. अनेक विषयांवर आपली रोखठोक मते ते मांडत असतात. 68 वर्षी बॉलीवूडमध्ये ते सक्रीय आहेत. आपला दमदार अभिनयामुळे दर्शकांची मने ते जिंकून घेतात. अनुपम खेर यांची ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची चर्चा झाली होती.

हे सुद्धा वाचा

भक्तांच्या गर्दीमुळे राम मंदिर ट्रेस्टने मंदिराची आरती आणि दर्शनाची वेळ बदलली आहे. दर्शन आता सकाळी सात वाजेपासून सुरु केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना तुर्त अयोध्या दौरा न करण्याचा सल्ला दिला आहे. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, म्हणून हा सल्ला मोदी यांनी मंत्र्यांना दिला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.