Threat to Sadhvi: ‘नशेत बोलतो आहेस का?’, कासकर गँगच्या पंटरला साध्वी प्रज्ञासिंग यांनी झापले, फोनवरच घेतली शाळा, पाहा VIDEO

साध्वी प्रज्ञासिंह यांना जेव्हा धमकी मिळाली, त्यावेळी साध्वी यांच्यासोबत असलेल्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. यावेळी साध्वी यांनी या पंटरची चांगलीच शाळा घेतली आहे. साध्वी आणि त्या व्यक्तीत काय संवाद झाला..

Threat to Sadhvi: 'नशेत बोलतो आहेस का?', कासकर गँगच्या पंटरला साध्वी प्रज्ञासिंग यांनी झापले, फोनवरच घेतली शाळा, पाहा VIDEO
Death threat to SadhviImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 5:16 PM

भोपाळ – भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह (BJP MP Sadhvi Pragnya)यांना जीवे मारण्याची धमकी b(Death threat) मिळाली आहे. एका अज्ञात नंबरवरुन त्यांना ही धमकी आली होती. फोन करणाऱ्याने इकबाल कासकर (Iqbal Kaskar) गँगमधून बोलत असल्याचे सांगितले होते. इक्बाल कासकर गँगचे कनेक्शन हे दाऊद इब्राहिम गँगशी आहे. दाऊद सध्या पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते. साध्वींना जीवे मारण्याच्या धमकीच्या प्रकरणात भोपाळच्या टीटी नगर पोलीस ठाण्यात अर्जही देण्यात आला आहे.

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरकडून प्रज्ञासिंह यांना धमकी

मोहम्मद पैंगबर वादग्रस्त प्रकरणात नुपूर शर्मांची साध्वी प्रज्ञासिंह यांनी काही दिवसांपूर्वी पाठराखण केली होती. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. फोन करणाऱ्या माणसाने फोनवर इक्बाल कासकरचा माणूस बोलत असल्याचे सांगितले होते. तुमची हत्या होणार आहे, म्हणून हे फोनवर सांगत असल्याचेही त्याने सांगितले. आता या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

साध्वी यांनी घेतली पंटरची शाळा

साध्वी प्रज्ञासिंह यांना जेव्हा धमकी मिळाली, त्यावेळी साध्वी यांच्यासोबत असलेल्यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. यावेळी साध्वी यांनी या पंटरची चांगलीच शाळा घेतली आहे. साध्वी आणि त्या व्यक्तीत काय संवाद झाला.. साध्वी- फोनवर बोलतो आहेस, तर तुझे नाव तरी सांग फोनवरील व्यक्ती – इक्बाल कासकरचा माणूस बोलतो आहे. साध्वी – कोण आहेत इक्बाल कासकर, कुठले आहेत. व्यक्ती – पाहाल मॅडम, तुम्हाला माहित पडेल साध्वी- आहेत कुठले हे कासकर, हे तर सांग, माझी हत्या करणार, काय कारण आहे, हे जरा सांगाल. व्यक्ती – एक्शनची रिएक्शन पाहून घ्या, मग बोला साध्वी – करा हत्या, तुमचा जीव वाचेल, माझी हत्या करा, पण कारण काय आहे हे तरी सांग व्यक्ती – मुसलमानांवर विष ओकणे, मुसलमानांना टार्गेट करणे, साध्वी- मुसलमान काय करतात, अमृत वर्षाव करतात का, मी असं काय म्हणाले ज्यामुळे तुम्हाला त्रास झाला. व्यक्ती – हत्येनंतर तुम्हाला माहीत पडेल साध्वी- मला कसं माहित पडेल, माझी तर तुम्ही हत्या करणार आहात व्यक्ती – तुम्हाला सूचना द्यायची होती, ती मी दिली आहे, ठीक आहे. साध्वी – करा हत्या दम असेल तर, कोणत्या गोष्टीचा त्रास झाला हे तर सांगा. मारल्यानंतर मला कसं कळेल, जिवंत आहे, तोपर्यंत सांगा व्यक्ती – जो व्यक्ती मारेल, तोच तुम्हाला कारण सांगेल साध्वी – मी जर मारले गेले तर तो मला कसे सांगले, नशेत बोलतो आहेस का व्यक्ती – नशेत कशाला बोलेन, तुमची हत्या होणार आहे, तुम्हाला सूचना द्यायची होती, ती दिली. साध्वी- तुझी एवढी औकात असेल तर समोर येऊन सांग ना भय्या, जिगरा असेल तर समोर येऊन बोल व्यक्ती – मारताना कळेल जिगरा आहे की काय आहे ते साध्वी- तुझ्य़ात जिगरा असता तर समोर येऊन बोलला असतास, फातू बडबड करु नकोस

नुपूर शर्मा यांची पाठराखण केल्याने धमकी

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी त्यांची भाजपाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर साध्वी यांनी नुपूर शर्मा यांची पाठराखण केली होती. भारत हिंदुंचा देश आहे. दुसऱ्या धर्मियांनी नेहमी हेच केले आहे. सनातन धर्म इथे जिवंत राहील, असे वक्तव्य त्यावेळी साध्वी यांनी केले होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.