Tamil Nadu : लष्कराच्या जवानाचा आरोप, पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली, पोलिस म्हणाले…

Tamil Nadu Police : या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत. पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली असल्याचा लष्कराच्या जवानाने आरोप केला आहे.

Tamil Nadu : लष्कराच्या जवानाचा आरोप, पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली, पोलिस म्हणाले...
TAMILNADUImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 3:59 PM

नवी दिल्ली : तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील तिरुवन्नामलाई जिल्ह्यातील लष्कराच्या जवानाने गंभीर आरोप केले आहेत. जवानाचं असं म्हणणं आहे की, पत्नीला अर्धनग्न अवस्थेत 120 लोकांनी बेदम मारहाण केली आहे. सेनेचे एक निवृत्त अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल एन त्यागराजन यांनी जवानाचा एक व्हिडीओ शेअर (VIRAL VIDEO) केला आहे. त्याने जवानाने आपलं पुर्ण म्हणणं मांडलं आहे. सेनेचे जवान हवालदार प्रभाकरन तमिलनाडू राज्यातील (Tamil Nadu Police) पदवेदु गावातील रहिवासी आहेत. सध्या ते काश्मीरला ऑनड्युटी आहेत.

जवानाचं म्हणणं आहे की, त्याची पत्नी एका लीजवर घेतलेल्या जागी दुकान चालवत आहे. तिला 120 लोकांनी मारहाण केली आहे. त्याचबरोबर दुकानातील सामान सुध्दा लोकांनी बाहेर फेकलं आहे. जवानाने एसपीकडे तक्रार दाखल केली आहे, त्याचबरोबर त्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जवानाने डीजीपीकडे मदत मागितली आहे, त्याचबरोबर जवान म्हणत आहे की, माझ्या कुटुंबावर लोकांनी चाकूने हल्ला केला आहे आणि धमकी दिली आहे. पत्नीला अर्धनग्न अवस्थेत लोकांनी बेदम मारहाण केली आहे.

हे सुद्धा वाचा

कंधवासल पोलिसांनी जाहीर केलं की, हे प्रकरण अधिक चढवून सांगण्यात आलं आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, रेणुगंबल मंदिरच्या संबंधित जागेवर असलेल दुकान प्रभाकरचे सासरे सेल्वामूर्ति कुमार यांना पाच वर्षासाठी लीज पद्धतीने देण्यात आलं होत. त्याच्यासाठी त्यांच्याकडून 9.5 लाख रुपये घेतले होते. सेल्वामूर्ति कुमारच्या मृत्यूनंतर, त्यांचा मुलगा रामू याला दुकान परत हवे होते, म्हणून त्याने पैसे परत करण्यास सहमती दर्शविली आणि 10 फेब्रुवारी रोजी करारावर स्वाक्षरी केली.

पत्नीला गंभीर दुखापत झाल्याचे जवानाचे म्हणणे…

सेल्वामूर्ती यांनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला, त्याचबरोबर दुकान सोडण्यास नकार दिल्याचा दावा रामूने केला आहे. 10 जून रोजी रामू सेल्वमूर्ती यांची मुले जीवा आणि उदय यांना पैसे देण्यासाठी दुकानात गेला आणि त्यांनी रामूवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी वाद वाढला, भांडण वाढले आणि तेथे उपस्थित असलेले लोक रामूच्या बाजूने उभे राहिले. जमलेल्या लोकांनी दुकानात ठेवलेले सामान बाहेर फेकले. त्यावेळी प्रभाकरनची पत्नी कीर्ती आणि त्याची आई दुकानात होती, जमावाने त्यांच्यावर हल्ला केला नाही. सायंकाळच्या सुमारास प्रभाकरनच्या पत्नीनेही स्वत:ला रुग्णालयात दाखल केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.