बापरे! भारतातील तब्बल 300 मुलींना अतिरेकी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानामध्ये पाठवल्याचा केंद्रीय यंत्रणांना संशय

विशेष म्हणजे धर्मांतर करुन लग्न केलेल्या मुलींचा शोध प्रामुख्यानं घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

बापरे! भारतातील तब्बल 300 मुलींना अतिरेकी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानामध्ये पाठवल्याचा केंद्रीय यंत्रणांना संशय
सांकेतिक फोटोImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 1:55 PM

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांना (Central Agencies) व्यक्त केलेल्या संशयामुळे सध्या सगळेच धास्तावले आहेत. देशातील तब्बल 300 मुलींना पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात (Pakistan News) पाठवणं आलं असावं, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी व्यक्त केलेल्या या संशयामुळे चिंता व्यक्त केली जातेय. या पार्सअवभूमीव देशातील सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातून तब्बल 300 मुलींना मध्य-पूर्व देशांच्या मार्गे या मुलींना पाकिस्तानात पाठवलं असण्याची शक्यताय. जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir News) सुरु असलेल्या अतिरेक्यांच्या दहशतवादी कारवाया पाहता, केंद्रीय तपास यंत्रणांनी वर्तवलेल्या शक्यतेमुळे काळजी व्यक्त केली जातेय.

हरवलेल्या मुली पाकिस्तानात गेल्या?

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांना सगळ्या सुरक्ष यंत्रणांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या तीनशे मुली नेमक्या कोणत्या आहेत, याबाबतही शोध घेतला जातोय. राज्यातील यंत्रणा हरवलेल्या व्यक्तींचं रजिस्टर आता तपासलं जातंय. यातील किती मुली परत आल्या, किती हरवल्या याची नोंद घेऊन काही माहिती हाती लागते का, याचा तपास केला जातोय.

नेमका संशय कुणावर?

दरम्यान, लग्न करुन परदेशात गेलेल्या मुलींचाही ठावठिकाणी शोधला जातोय. यात विशेष म्हणजे धर्मांतर करुन लग्न केलेल्या मुलींचा शोध प्रामुख्यानं घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्च राज्यांना याबाबत अलर्ट देण्यात आला आहे. अशा मुलींबाबत पुटशी जरी माहिती समोर आली, तर ती हलक्यात घेऊ नये, असं स्पष्ट करण्यात आलं. महिन्याभरापूर्वी राज्यातील सुरक्षा यंत्रणांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सुंदर मुलींना प्राधान्य

ज्या मुलींना दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं, त्यात काही खास गोष्टींना प्राधान्यही देण्यात आलं. सुंदर, आकर्षक दिसणाऱ्या मुलांनी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात प्राधान्य दिल्याचाही संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रशिक्षणानंतर दहशतवादी हल्ले करण्यासोबतच महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्क्तींना हनी ट्रॅपमध्ये ओढण्यासाठी या मुलींचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

धक्कादायक बाब म्हणजे मुलींना यआधी दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही समोर आलेलं होतं. 100 मुलींना प्रशिक्षण दिल जात असल्याची बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर 700 महिलांना पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात कॅम्पमध्ये अतिरेकी कारवायांचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं 2009 मध्ययेही उघडकीस आलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.