AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा : अरविंद केजरीवाल

कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांनी मांडले आहे.

कोरोनाची लस देताना सामान्य-व्हीआयपी असा भेदभाव करु नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा : अरविंद केजरीवाल
| Updated on: Nov 21, 2020 | 10:46 AM
Share

दिल्ली : कोरोनाची लस (Corona Vaccine) देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मांडले आहे. केजरीवाल म्हणाले की सर्वांचाच जीव महत्त्वाचा आहे, त्यामुळे कोरोनाची लस देताना सामान्य आणि व्हीआयपी असा भेदभाव केला जाऊ नये. कोरोनाची लस देताना कोरोना योद्ध्यांना प्राधान्य द्यायला हवे. त्यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्राधान्य द्यायला हवे. (Arvind Kejriwal says Do not discriminate VIP or Non VIP categories for Covid-19 Vaccine)

केजरीवाल म्हणाले की, कोरोनावरील लशीचं वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून योजना तयार केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार मात्र राजकीय विचार न करता तांत्रिकदृष्ट्या आणि प्राथमिकतेच्या आधारावर कोरोनावरील लशीचं वितरण करण्यास प्राधान्य देईल.

मुंबई सावरतेय, दिल्लीत कोरोनाचा कहर

हिवाळा सुरू होताच दिल्लीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत असून मुंबई मात्र सावरल्याचं दिसून येत आहे. दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे.

हिवाळा सुरू झाला असून दिल्लीमध्ये कोविड बाधितांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, याबाबत एका डॉक्टराने तपमान व कोविड याचा थेट संबंध नसल्याचे सांगितले आहे. मात्र, हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीकरांकडून सतत कपडे बदलण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते, असे या डॉक्टराने नमूद केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

28 ऑक्टोबरपासून दिल्लीतली परिस्थिती बिघडली

दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते. कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 7943 वर पोहोचली आहे. यासोबत दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येंने 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. 4 लाख 52 हजार 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 42 हजार 458 जणांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

दिल्लीच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा लॉकडाऊन?, केजरीवालांचा केंद्र सरकारला प्रस्ताव

देशातली पहिली कोरोना लस ‘कोव्हॅक्सिन’ची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू, 26 हजार स्वयंसेवकांचा समावेश

(Arvind Kejriwal says Do not discriminate VIP or Non VIP categories for Covid-19 Vaccine)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.