केजरीवालांनी केंद्राविरोधात दंड थोपटले; आतापर्यंत ‘या’ पक्षांनीही दिला पाठिंबा

केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत दिल्लीतील जनता 8 वर्षे न्यायासाठी लढत राहिली आहे मात्र भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अवघ्या 8 दिवसांत उलटवला असल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे.

केजरीवालांनी केंद्राविरोधात दंड थोपटले; आतापर्यंत 'या' पक्षांनीही दिला पाठिंबा
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 1:25 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोट बांधत आहेत. मात्र त्याला आता मोठा पाठिंबाही दर्शवला जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडून हे विधेयक राज्यसभेत रद्द करण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी त्यांच्याकडून सगळी जय्यत तयारी केली जात आहे. आतापर्यंत, जेडीयू,आरजेडी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस, बीआरसी आणि माकप तसेच द्रविड मुन्नेत्र कळघमने अध्यादेशाला पाठिंबा दर्शवला आहे.

सध्या या आंदोलनाला जोरदार धार आली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख अध्यक्ष एमके स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला पोहचले आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आश्वासन दिले की त्यांचा पक्ष राज्यसभेत अध्यादेशाच्या विरोधात मतदान करणार आहे. स्टॅलिन यांनी केंद्रावर बिगर भाजप राज्यात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्याचा आरोप केला आहे.

तर केंद्र सरकार योग्यरित्या निवडून आलेल्या राज्य सरकारलाही स्वतंत्रपणे काम करण्यापासून थांबवत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अध्यादेशाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन स्टॅलिन यांनी केले आहे.

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षांमध्येही अशी निष्पक्षपणे चर्चा होत राहिली पाहिजे असं मतही स्टॅलिन यांनी यावेली व्यक्त केले आहे.

दुसरीकडे केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत दिल्लीतील जनता 8 वर्षे न्यायासाठी लढत राहिली आहे मात्र भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अवघ्या 8 दिवसांत उलटवला असल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे.

त्यामुळे त्यांनी केंद्राचा अध्यादेश लोकशाही विरोधी आणि असंविधानिक असल्याचे सांगत भाजप लोकशाही विरोधी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....