Asaduddin Owaisi on BJP : भाजपने भारतातील मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले, असदुद्दीन ओवेसेंची भाजपसह इतर पक्षांवरती जोरदार टीका
त्यांना आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घ्यायचा आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते अयशस्वी ठरले आहेत. भाजपने मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यूपीचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले की, तुम्ही यूपीमध्ये भाजपाला मतदान केले.
नवी दिल्ली – असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी हैदराबादच्या (Hyderabad) सरूरनगरमध्ये झालेल्या हत्येवर काल मौन सोडले आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले आहेत. त्या प्रकरणात मुलीने मर्जीने लग्न केले होते. त्या गोष्टीला कायद्यात परवानगी आहे. मात्र मोदी जहांगीरपुरी, सेंडवा, खरगोनवर या प्रकरणावर बोलणार आहेत का ? असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे. ओवेसी यांनी दिंडोरीचाही उल्लेख केला आहे. आसिफने मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) दिंडोरी येथे साक्षीशी लग्न केले तेव्हा त्याचे घर पाडण्यात आले. ज्या इसमाने अखलाकची हत्या केली त्याचा हार घालून सत्कार केला. झालेल्या सगळ्या घटनांवर पंतप्रधान कधी बोलणार आहेत का ? अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
#Nagraju की नृशंस हत्या पर साफ़ साफ़ बोले @asadowaisi – “जुर्म है ये , क़ानूनन जुर्म है ये।मैं खुलेआम condemn करता हूँ। अल्लाह से डरो”
याद नहीं आता कि किसी मुस्लिम युवक की हत्या पर आज तक किसी भाजपा या हिंदूवादी नेता ने एक भी शब्द कहा हो। pic.twitter.com/yTZoVQL0FN
— Vinod Kapri (@vinodkapri) May 6, 2022
ओवेसी यांनी भाजप आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली
असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. भारतातील मुस्लिमांनी त्यांचे राजकीय नेतृत्व तयार करायला पाहिजे. जोपर्यंत मुस्लिम आपले प्रतिनिधी निवडत नाहीत. तोपर्यंत द्वेषाचे वादळ कधीचं थांबणार नाही. ज्यांना तुमचा रक्तपात करायचा आहे. ते कधीही थांबणार नाहीत. यासाठी तुम्हाला राजकीय नेतृत्व तयार करायला पाहिजे. ज्यावेळी मुस्लिम प्रतिनिधी तयार होतील त्यावेळी अशा प्रकरणाला कुठेतरी आळा बसेल.
आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घ्यायचा आहे
त्यांना आमचा हक्क आमच्याकडून हिसकावून घ्यायचा आहे. तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते अयशस्वी ठरले आहेत. भाजपने मुस्लिमांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. यूपीचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले की, तुम्ही यूपीमध्ये भाजपाला मतदान केले. त्याचे काय परिणाम झाले, युपीत भाजप जिंकला. तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना विजयी केले असते तर आज त्यांनी तुमच्यासाठी संघर्ष केला असता. तुम्ही सरकार बदलू शकत नाही. तुम्ही हे सगळं प्रकरण समजून घेतले पाहिजे. सरकार बदलण्याचे आवाहन करणारे आज कुठे आहेत? आमचा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाईल. आम्ही बिहारमध्ये लोकसभा निवडणूक सुध्दा लढवू असं ओवेसी म्हणाले.
समाजवादी पक्ष शांत का ?
यूपीमध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारावर समाजवादी पक्षाकडून कोणतेही वक्तव्य अद्याप करण्यात आलेलं नाही. असा एकही दिवस नाही इथे मुस्लिमांना लक्ष्य केले जात नाही. जहांगीरपुरी मशिदीसमोरील गेट तोडण्यात आले, तिथे सुध्दा कोणी दिसले नाही.