Asaduddin Owaisi : ओवैसी रांची विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा! देणारे महाभाग कोण?

विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी आज रांची विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांच्या पक्ष AIMIM चे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी ओवेसी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणांमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या.

Asaduddin Owaisi : ओवैसी रांची विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा! देणारे महाभाग कोण?
ओवैसी रांची विमानतळावर पोहोचल्यावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा!Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 8:45 PM

रांची, झारखंड : देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरू असलेलं पाकिस्तान (Pakistan) आणि भारताचं (India) वैर हे आजपर्यंत संपलेलं नाही. मात्र आज झारखंडमधील रांची विमानतळावर घडलेला प्रकार हा प्रत्येक भारतीयाला संताप आणणारा आहे.कारण रांची विमानतळावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या स्वागतावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. ओवेसी हे मांडेर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार देवकुमार पॅडी यांच्या प्रचारासाठी दाखल झाले.या विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी आज रांची विमानतळावर पोहोचले. यावेळी त्यांच्या पक्ष AIMIM चे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी ओवेसी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घोषणांमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. या प्रकाराने आता देशभरात खळबळ माजली आहे. यावरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विमानतळावर घोषणा देतानाचा व्हिडिओ

दौरा वादात सापडण्याची शक्यता

ओवेसी यांच्या एका समर्थकाने या घोषणा दिल्याचे बोलले जात आहे. मात्र या घोषणा कोणी दिल्या आणि त्याचा उद्देश काय? त्याबद्दल तुर्तास तरी काही सांगता येत नाही. मंदार पोटनिवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एंट्रीने निवडणूक समीकरण बदलेल की नाही. पण रांचीमध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या नारेबाजीनंतर ओवेसींचा निवडणूक दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता नक्कीच आहे.

पोलिसांकडून घोषणेबाजीची दखल

रांची विमानतळावरील या घोषणांबाबत रांची शहराचे एसपी अंशुमन कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची दखल आम्ही घेतली आहे. समोर आलेल्या व्हिडिओ आणि ऑडिओची सत्यता पडताळली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल.

अशा घोषणाबाजीची ही पहिलीच वेळ नाही

या पोटनिवडणुकीत ओवेसींनी मुस्लिम मतं आपल्या बाजुने वळवली तर त्याचा थेट फायदा भाजप उमेदवार गंगोत्री कुजूर यांना होईल, असे राजकीय जाणकार सांगता. अर्थात याचे नुकासन हे काँग्रेसला सहन करावे लागेल. ओवेसींच्या कार्यक्रमात पाकिस्तानबाबत घोषणाबाजी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सीएएविरोधी निदर्शनात एका मुलीने ओवेसींच्या मंचावरून घोषणाबाजी केली होती, त्यानंतर तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ओवेसी यांनी या प्रकारापासून हात झटकले होते. आता पुन्हा झालेल्या या घोषणाबाजीने खळबळ माजली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.