Breaking : उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार! ओवेसी सुखरुप

AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत.

Breaking : उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार! ओवेसी सुखरुप
असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर उत्तर प्रदेशात गोळीबार
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 6:39 PM

मुंबई : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या गाडीवर गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या गाडीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या खुणा त्यांच्या गाडीवर दिसून येत आहेत. मात्र, या हल्ल्यात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही. “काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. 4 राऊंड फायर करण्यात आले. 3 ते 4 लोक होते, सर्वजण पळून गेले आणि शस्त्र तिथेच सोडून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, मात्र मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्वजण सुखरुप आहोत”, असं ट्वीट ओवेसी यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी गोळीबाराच्या खुणा असलेला गाडीचा फोटोही शेअर केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ओवेसी हे मेरठमधील किठौर इथला एक निवडणूक कार्यक्रम आटोपून दिल्लीसाठी रवाना होत होते. त्यावेळी छिजारसी टोल प्लाजाजवळ 2 लोकांनी त्यांच्या गाडीवर 3-4 राऊंड फायर केले. एकूण 3 थे 4 हल्लेखोर होते. गोळीबारात ओवेसी यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं त्यामुळे ते दुसऱ्या गाडीतून निघून गेले.

एमआयएमच्या वारीस पठाण यांना काळं फासलं!

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी एमआयएमचे महाराष्ट्रातील माजी आमदार वारीस पठाण यांना काळ फासण्याची घटना इंदुरमध्ये घडली होती. वारीस पठाण यांना काळं फासल्याचा दावा करत एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. वारीस पठाण हे सध्या मध्य प्रदेशच्या इंदुरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी एका तरुणानं वारीस पठाण यांना काळं फासल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत वारीस पठाण यांनाच विचारलं असता अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आपण एका दर्ग्यात गेलो होतो. तिथे चादर पेश केली. तिथे काही तरुणांनी आपलं हार घालून स्वागत गेलं. तसंच एका तरुणानं नजर लागू नये म्हणून लहान मुलांना लावतात ते काजळ लावलं होतं. पण सगळ्या इंदुरमध्ये असं काजळ लावून कसं फिरणार म्हणून मी एका ठिकाणी बसून ते धुतलं. मात्र, काँग्रेसवाल्यांनी तेव्हा फोटो काढून काळं फासल्याची अफवा उठवल्याचा दावा पठाण यांनी केलाय. तसंच काँग्रेस घाबरली आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

Waris-Pathan

वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासण्याची घटना

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

दरम्यान, वारीस पठाण यांनी आपल्याला काळं फासल्याचा दावा फेटाळून लावला असला तरी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण त्यांना काळ फासून पळाल्याचं पाहायला मिळत आहे. वारीस पठाण जेव्हा दर्गाहवर चादर चढवून बाहेर येतात. त्यावेळी काही लोक तिथे उभे असतात. त्यातील एकजण त्यांना हार घालतो आणि काळं फासून पळतो. तेव्हा तिथे असलेले अन्य काही जण त्या तरुणाला पकडा असा आवाज करताना दिसत आहेत, व्हिडीओमध्ये तो गोंधळ ऐकायलाही मिळत आहे. त्यामुळे वारीस पठाण यांनी आपल्याला काळं फासलं गेलं नाही तर काजळ लावल्याचा दावा किती खरा आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

इतर बातम्या :

‘महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा

POCRA : ‘पोकरा’चे रखडलेले अनुदान थेट खात्यामध्ये, पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.