गोडसेंबाबत काय म्हणाल?; ओवेसींचा भागवतांना सवाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काहीही झाले तरी हिंदू कधीच देशद्रोही होऊ शकत नाही, असं विधान केलं आहे. (Asaduddin Owaisi's attack on Mohan Bhagwat)

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काहीही झाले तरी हिंदू कधीच देशद्रोही होऊ शकत नाही, असं विधान केलं आहे. त्यावर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केला आहे. ते ठिक आहे. पण नथुराम गोडसेंबाबत काय म्हणाल?, असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी भागवत यांना केला आहे. (Asaduddin Owaisi’s attack on Mohan Bhagwat)
एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. महात्मा गांधींचे मारेकरी गोडसेंबाबत भागवत उत्तर देतील का? आसाममधील नेली नरसंहाराला जबाबदार असलेल्या व्यक्तीबाबत काय म्हणाल? 1984मध्ये झालेल्या शीख दंगली आणि 2002मधील गुजरात दंगलीबाबत भागवत काय सांगणार आहेत?, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
भलेही कोणत्याही धर्माचे असोत पण सर्वाधिक भारतीय देशभक्त आहेत हे मानणं तर्कसंगत आहे. मात्र, केवळ संघाच्या विचारधारेतच केवळ एकाच धर्माच्या अनुयायांना देशभक्तीचं प्रमाण दिलं जातं. तर इतरांना ते सुद्धा भारतीय आहेत आणि त्यांनाही या देशात राहण्याचा अधिकार आहे, हे सिद्ध करावं लागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते भागवत?
मोहन भागवत काल शुक्रवारी दिल्लीत एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं होतं. जर कोणी हिंदू असेल तर तो देशभक्त असणारच. देशभक्ती हेच आपल्या धर्माचं मूळ असून देशभक्ती हाच हिंदुंचा स्वभावही आहे. काहीही होवो, पण हिंदू कधीच देशद्रोही होऊ शकत नाही, असं भागवत यांनी स्पष्ट केलं होतं.
जे. के. बजाज आणि एम. डी. श्रीनिवास यांनी लिहिलेल्या ‘मेकिंग ऑफ ए हिंदू पॅट्रियट: बॅकग्राऊंड ऑफ गांधीजी हिंद स्वराज’ या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलं. त्यावेळी त्यांनी गांधीजींच्या देशभक्तीची उत्पत्ती धर्मातून झालेली असल्याचंही स्पष्ट केलं. या पुस्तकाचं प्रकाशन करताना मी गांधीजींना आमच्या सोयीने सादर करत असल्याची टीकाही माझ्यावर होऊ शकते, असं ते म्हणाले. तसेच कोणत्याही महापुरुषाला कोणीही आपल्या सोयीने परिभाषित करू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. (Asaduddin Owaisi’s attack on Mohan Bhagwat)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 2 January 2021https://t.co/EMAARYJDLU
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021
संबंधित बातम्या:
भाजपमध्ये संघटनात्मक मोठे बदल, आरएसएसच्या नेत्यांचं पक्षातलं वजन घटवलं?
बिहारमध्ये पुन्हा भाजप संकटात? लालू-नितीश एकत्र येणार?; राबडीदेवी काय म्हणाल्या?
शनिवार विशेष : ममता बॅनर्जींना सत्तेत आणणाऱ्या नंदिग्रामची कहाणी, पुन्हा नंदिग्राम का गाजतंय?
(Asaduddin Owaisi’s attack on Mohan Bhagwat)