अधीर रंजन चौधरी म्हणाले ममता बॅनर्जी ‘पागल’! देशभरात काँग्रेसचे 700 आमदार असल्याचंही आवर्जून सांगितलं
अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केलाय. पागल व्यक्तीला उत्तर देणं योग्य ठरत नाही. संपूर्ण देशात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. दीदींकडे काय आहे? काँग्रेसकडे विरोधकांच्या एकूण वोट शेअर पैकी 20 टक्के आहे. त्यांच्याकडे काय आहे? काँग्रेस नसती तर त्यांच्यासारखे नेतेही नसते, अशा शब्दात चौधरी यांनी ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury ) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. चौधरी यांनी ममता बॅनर्जी या पागल असल्याचं म्हटलंय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला एक सल्ला देऊ केलाय. त्यावरुनच अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केलाय. पागल व्यक्तीला उत्तर देणं योग्य ठरत नाही. संपूर्ण देशात काँग्रेसचे 700 आमदार आहेत. दीदींकडे काय आहे? काँग्रेसकडे विरोधकांच्या एकूण वोट शेअर पैकी 20 टक्के आहे. त्यांच्याकडे काय आहे? काँग्रेस नसती तर त्यांच्यासारखे नेतेही नसते, अशा शब्दात चौधरी यांनी ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर दिलंय.
ममता बॅनर्जी या भाजपला खूश करण्यासाठी आणि त्यांचा एजंट म्हणून काम करण्यासाठी असं बोलत आहेत. तसंच सातत्याने चर्चेत राहण्यासाठी त्या अशी वक्तव्य करत असल्याची टीकाही चौधरी यांनी केलीय. इतकंच नाही तर ममता बॅनर्जी काँग्रेस विरोधात का बोलत आहेत? काँग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारखे लोकही नसते. त्या भाजपला खूश करण्यासाठीच गोव्यात गेल्या. त्यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी मेहनत घेतली. ममता दीदींनीच गोव्यात काँग्रेसला कमकुवत केलं आणि हे सर्वजण जाणतात, असा आरोपही चौधरी यांनी केलाय.
Not right to respond to a mad person. Congress has 700 MLAs across India. Does Didi have it? Congress has 20% of Opposition’s total vote share. Does she have it? She’s saying this to please BJP & act as its agent. She says things like this to stay relevant: AR Chowdhury, Congress https://t.co/jhQEfJj5T0 pic.twitter.com/JQxfbRGIlq
— ANI (@ANI) March 12, 2022
ममता बॅनर्जींचा काँग्रेसवर निशाणा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. चार राज्यात भाजपनं पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा धुव्वा उडवला आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी देशभरातील प्रादेशिक पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरु केलेत. काँग्रेसला सोबत ठेवण्यात आता काही अर्थ नाही. कारण, आता पहिली काँग्रेस राहिलेली नाही. भाजपचा सामना करण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे. काँग्रेसवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.
‘काँग्रेसची विश्वासार्हता संपली’
काँग्रेसला सर्व ठिकाणी पराभव पत्करावा लागत आहे. आता काँग्रेसला जिंकण्याची इच्छा आहे असं वाटत नाही. त्यांची विश्वासार्हता संपलीय. त्यामुळे आता काँग्रेसवर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. तसंच ‘काँग्रेस आधी विजय मिळवण्यात यशस्वी ठरत होती. कारण, त्यांची संघटना मजबूत होती. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या या टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांचा उद्देश समान आहे. मोदींना काँग्रेस मुक्त भारत हवाय. तर ममता काँग्रेसशिवाय विरोधकांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहेत, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आलीय.
इतर बातम्या :