Atlas Cycles | सायकल दिनीच ‘अ‍ॅटलास’ खिळखिळी, 40 लाख सायकल बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन बंद

जागतिक सायकल दिनाच्या दिवशी प्रसिद्ध सायकल कंपनी अ‍ॅटलासने आर्थिक अडचणींमुळे कारखान्यातील काम थांबवलं आहे.

Atlas Cycles | सायकल दिनीच 'अ‍ॅटलास' खिळखिळी, 40 लाख सायकल बनवणाऱ्या कंपनीचे उत्पादन बंद
Follow us
| Updated on: Jun 04, 2020 | 4:22 PM

नवी दिल्ली : जागतिक सायकल दिनाच्या दिवशी (3 जून) प्रसिद्ध (Atlas Cycles Announces Temporary Lay-off) सायकल कंपनी अ‍ॅटलासने आर्थिक अडचणींमुळे कारखान्यातील (हरियाणा) काम थांबवलं आहे. 69 वर्ष जुन्या या कंपनीमध्ये उत्पादन ठप्प झाल्याने कंपनीच्या 1000 कर्मचाऱ्यांसमोर पोटापाण्याचं मोठं संकट उभं राहिलं आहे. एकेकाळी याच कंपनीने वर्षाला 40 लाख सायकल बनवल्याचा विक्रम केला होता. मात्र, आता याच कंपनीच्या संचालकांकडे कारखाना चालवण्यासाठी पैसे नसल्याचं कंपनीच्या ले-ऑफ नोटीसमध्ये (Atlas Cycles Announces Temporary Lay-off) सांगण्यात आलं.

कंपनीकडे सध्या कच्चा माल खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ले-ऑफ करण्यास सांगण्यात आलं आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना उपस्थिती नोंदवून परत जावं लागतं. म्हणजे कारखान्यात काम बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना रोज त्यांच्या-त्यांच्या वेळी कारखान्यात येऊन आपली उपस्थिती नोंदवायची असते.

अ‍ॅटलास कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. कंपनीने सर्व उपलब्ध निधी खर्च केला आहे. आता कंपनीजवळ उत्पन्नाचं कुठलाही स्त्रोत नाही. रोजच्या खर्चांसाठीही कंपनीकडे पैसे नाहीत. ले-ऑफ नोटीसमध्ये व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं, जोपर्यंत संचालक पैशांची सोय करत नाहीत तोपर्यंत कारखान्यात कच्चा माल येणार नाही. अशा परिस्थितीत संचालक कारखाना चालवण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी 3 जूनपासून ले-ऑफ करावं.

1951 मध्ये जानकी दास कपूर यांनी अ‍ॅटलास कंपनी सुरु केली. कंपनीने पहिल्याच वर्षी 12 हजार सायकल बनवण्याचा रेकॉर्ड केला. 1965 पर्यंत ही कंपनी देशातील सर्वात मोठी सायकल बनवणारी कंपनी ठरली. 1978 मध्ये भारतात पहिली रेसिंग सायकल आणली. त्यामुळे अ‍ॅटलास कंपनीला ब्रिटीश स्टॅण्डर्ड इन्स्टिट्यूशनकडून आयएसओ 9001-2015 प्रमाणपत्रासह अधिकृत मान्यता देखील देण्यात आली (Atlas Cycles Announces Temporary Lay-off).

अ‍ॅटलास कंपनीचा आतापर्यंतचा प्रवास

1951 मध्ये स्थापनानंतर पहिल्याच वर्षी 12 हजार सायकल बनवल्या

1958 मध्ये पहिल्यांदा निर्यात

1965 मध्ये सर्वात मोठी सायकल निर्माता कंपनी बनली, निर्यातचाही विक्रम

1978 मध्ये पहिली रेसिंग सायकल बनवली, त्यासोबत सर्व वयाच्या लोकांसाठी सायकल तयार केल्या

कंपनीला इटलीच्या गोल्ड मर्करी इंटरनॅशनल अवार्ड मिळाला

2003 मध्ये अ‍ॅटलास ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजची पुनर्रचना, जयदेव कपूर कंपनीचे अध्यक्ष झाले

2005 मध्ये परदेशातील अनेक कंपन्यांसोबत एकत्रित उत्पादन सुरु केले.

लोकांच्या नोकर्‍या वाचवण्यासाठी सरकारने आपली धोरणं स्पष्ट करावी : प्रियांका गांधी

अ‍ॅटलास कंपनी आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांनी त्यांचं उत्पादन थांबवलं. याबाबत राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. “काल जागतिक सायकल दिनाच्या दिवशी अ‍ॅटलास कंपनीने गाझियाबाद येथील कारखाना बंद केला. त्यामुळे एका झटक्यात 1000 पेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले. सरकारची मोहीम ऐकली की इतके पॅकेज, इतके सामंजस्य करार, इतके रोजगार. पण प्रत्यक्षात रोजगार संपत आहेत, कारखाने बंद पडत आहेत. लोकांच्या नोकर्‍या वाचवण्यासाठी सरकारने आपली धोरणं आणि योजना स्पष्ट केल्या पाहिजे”, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी ट्विट करत केली.

Atlas Cycles Announces Temporary Lay-off

संबंधित बातम्या :

नोकऱ्या गेल्या असतील, पगार कपात झाली असेल तर आम्हाला संपर्क साधा, मनसेचं तरुणांना आवाहन

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

OLA | तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी, उत्पन्न घटल्याने ‘ओला’वर वाईट वेळ

‘ओयो’च्या कर्मचार्‍यांच्या वेतनात 25 टक्के कपात, चार महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्याचीही चाचपणी

“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.