टार्गेट किलिंगनंतर आता जम्मू-काश्मिरात प्राचीन मंदिरांवर हल्ले, वासुकी नाग मंदिरात रात्रीतून मूर्ती केल्या खंडित, घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांची निदर्शने
हिंदू संघटनांनी या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वासुकी नाग मंदिर तोडफोड प्रकरणात एक फोटो सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासासाठी पोलिसांची विशेष टीम घटनास्थळी पोहचली आहे.
जम्मू -जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir)डोडा जिल्ह्यात भदरवाह परिसरात असलेल्या वासुकी नाग मंदिरावर (Vasuki Nag Temple)रविवारी रात्री हल्ला करण्यात आला आहे. रात्रीतन काही समाजकंटकांनी मंदिरात तोडफोड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. भदरवाहला भद्रकाशी असेही म्हटले जाते. सकाळी पुजारी मंदिरात पवोहचल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. जेव्हा पुजारी सकाळी देवळात पोहचले तेव्हा दरवाजे आणि खिडक्या तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मूर्ती खंडित केल्या होत्या, (idols broken)दगड खाली पडलेले होते. ही बातमी पसरताच मंदिराच्या बाहेर स्थानिकांची मोठी गर्दी जमा झाली. त्यानंतर हिंदू संघटनांनी या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वासुकी नाग मंदिर तोडफोड प्रकरणात एक फोटो सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तपासासाठी पोलिसांची विशेष टीम घटनास्थळी पोहचली आहे.
A #Hindu temple has been reportedly vandalised in Bhaderwah of Jammu division. Miscreants also vandalised the idols at Shri Vasuki Nagraj Maharaj temple at Kailash Kund. #JammuAndKashmir #jammu pic.twitter.com/HM6DCFWTZL
हे सुद्धा वाचा— Arjun Sharma (अर्जुन शर्मा) (@arjunsharma_86) June 6, 2022
टार्गेट किलिंगनंतर दहशत पसरवण्याचा प्रयत्न
काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काश्मिरी पंडित आणि गैर काश्मिरींना टार्गेट केले जात आहे. यामुळे काश्मिरी खोरे सोडण्याची वेळ काश्मिरी पंडितांवर आली आहे. यातील अनेक काश्मिरी पंडित हे जम्मूत येऊन दाखल होत आहेत. अशा स्थितीत जम्मूतही मंदिरांवर हल्ले करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतो आहे.
कमल ३७० हटवल्यानंतर आणि काश्मीर फाईल्स सिनेमानंतर हिंसेत वाढ
गेल्या दोन वर्षापूर्वी काशिम्रातील कलम ३७० हटविण्यात आले, त्यानंतर पुढील दीड-दोन वर्षै काश्मीरात हिंसाचार सुरु असला तरी त्याची माहिती फारशी बाहेर येत नव्हती. त्यानंतर याच वर्षात आलेल्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटानंतर काश्मिरी पंडितांचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून टार्गेट किलींगचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत पाकिस्तानातून या सगळ्या दहशतवाद्यांना बळ मिळताना दिसते आहे. जम्मू-काश्मिरात इतर परप्रातियांनी येूऊ नये, स्थायिक होऊ नये यासाठी दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते आहे.