Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वात मोठी बातमी, ‘या’ तारखेला मंदिराचं उद्घाटन

अयोध्येतील राम मंदिराबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज कार्यक्रमाचं निमंत्रण देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराबाबत सर्वात मोठी बातमी, 'या' तारखेला मंदिराचं उद्घाटन
Follow us
| Updated on: Oct 25, 2023 | 8:24 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : अयोध्येतील राम मंदिराचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाचा जंगी कार्यक्रम आता लवकरच पार पडणार आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अयोध्येच्या राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. राम मंदिराचं 22 जानेवारी 2024 ला उद्घाटन होणार आहे. अयोध्ये मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे. 22 जानेवारीला दुपारे साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचं प्रसारण देश-विदेशात लाईव्ह केले जाणार आहे. देशातील सगळ्या राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं जाणार आहे. देशातील प्रसिद्ध क्रीडापटू, साहित्यिक, वरिष्ठ पत्रकारांनाही 22 जानेवारीचे निमंत्रण दिलं जाणार आहे. राम मंदिराच्या आंदोलनात ज्या कारसेवकांचा मृत्यू झाला होता त्यांच्या नातेवाईकांनाही निमंत्रण दिलं जाणार आहे.

नरेंद्र मोदी यांची ट्विटरवर प्रतिक्रिया

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. “जय सीताराम! आजचा दिवस खूप भावनांनी भरलेला होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला श्रीराम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी अयोध्येत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मी स्वत:ला खूप धन्य मानतोय. हे माझ्य भाग्य आहे की, मी या ऐतिहासिक क्षणांचा साक्षी बनणार आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर म्हणाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.