Ram Mandir | ‘एआय’चा चमत्कार, अयोध्येत रामलल्लाचे डोळे उघडले, गोड हसले, व्हिडिओ व्हायरल
Ram Mandir ayodhya | अयोध्या येथील रामलल्लाची सुंदर मूर्ती पाहून सर्वच जण भरावून जात आहेत. टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून रामलल्लीची ही मूर्ती घराघरात पोहचली आहे. आता या मूर्तीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
अयोध्या, दि.26 जानेवारी 2024 | अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले आहे. अयोध्येतील मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. आता लाखो भाविक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत. कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांनी केलेली रामलल्लाची सुंदर मूर्ती पाहून सर्वच जण भरावून जात आहेत. टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमातून रामलल्लाची ही मूर्ती घराघरात पोहचली आहे. मग नेटकरी रामलल्लाची ही मूर्ती आणि व्हिडिओ शेअर करत आहे. रामलल्लाचे डोळे सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. आता हेच बोलके डोळे उघडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करुन हे डोळे उघडले आहे. परंतु रामभक्तांना हा व्हिडिओ चांगलाच भावला आहे.
व्हिडिओ झाला शेअर
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पाच वर्षीय रामलल्लाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये एका आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीने तयार केलेला व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल झाला आहे. यामध्ये श्रीरामलल्ला डोळे उघडत भाविकांकडे पाहून गोड हसताना दिसत आहेत. तसेच मान हलवून दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडे पाहताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
अयोध्येत रामलल्लाने डोळे उघडले, एआयचा चमत्कार #Ayodhya #RamLalla pic.twitter.com/mT2udY5x1J
— jitendra (@jitendrazavar) January 26, 2024
अरुण योगीराज यांनी केली मूर्ती
अयोध्येतील रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील मूर्तीकर अरुण योगीराज यांनी केली आहे. ते म्हैसूर महलमधील शिल्पकारांच्या परिवारातून ते येतात. त्यांच्या अनेक पिढ्या मूर्ती तयार करण्याचे काम करत आहेत. एमबीएची पदवी घेतलेले अरुण योगीराज यांचे वडील कुशल मूर्तीकार आहेत. त्यांनी गायत्री मंदिर आणि भुवनेश्वरी मंदिरतील मूर्ती तयार केली आहे.
इंडिया गेटवर उभारण्यात आलेली नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 30 फूट उंचीची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतूक केले होते. त्यांनी घडवलेली रामलल्लाची मूर्ती पाहून देशभरातील रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचा आनंद मिळत आहे.