‘आर्थिक फायदा नव्हे तर लोकांचे आरोग्य हाच मुख्य उद्देश’, पतंजलीने ‘गुलाब सरबत’ नेमकं का आणलं?
बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी सुरू केलेल्या पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या गुलाब सरबताची सध्या देशभराच चर्चा चालू आहे. या कंपनीने गुलाब सरबतासोबतच खस सरबत आणि बेल सरबताच्याही पुरवठ्यात वाढ केली आहे.

Patanjali Gulab Sharbat : बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी सुरू केलेल्या पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या गुलाब सरबताची सध्या देशभराच चर्चा चालू आहे. या कंपनीने गुलाब सरबतासोबतच खस सरबत आणि बेल सरबताच्याही पुरवठ्यात वाढ केली आहे. या सरबताच्या माध्यमातून लोकांना गर्मी, उन्हापासून दिलासा मिळावा तसेच लोकांच्या आरोग्याचेही रक्षण व्हावे हा पतंजली आयुर्वेदचा उद्देश आहे.
आरोग्याचेही रक्षण व्हावे हाच उद्देश
गुलाब सरबताचा आयुर्वेदिक फायदा आणि ते तयार करताना वापरण्यात आलेली सामग्री हेच त्या सरबताची विशेष बाब आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पंतजली आयुर्वेद ही कंपनी चालू करतानाच नफा कमवण्याऐवजी लोकहिताचे काही ठोस हेतू समोर ठेवले होते. या कंपनीने तयार केलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आयुर्वेदाचा फायदा पोहोचला पाहिजे, हा ही कंपनी चालू करण्यामागचा मुख्य हेतू होता. कंपनीने तयार केलेल्या उत्पादनांच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याचेही रक्षण व्हावे, हादेखील याच हेतूंपैकी एक हेतू आहे.
कंपनी मोठा नफा मिळवू शकली असती पण…
पतंजली आयुर्वेद ही कंपनी एफएमसीजी क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. ही कंपनी कोला, कार्बोनेटेड, सोडा बेस्ड पेय तयार करण्याच्या व्यवसायात उतरू शकली असती. असा निर्णय घेऊन ही कंपनी बेवरेज बाजारातू मोठा नफा मिळवू शकली असती. मात्र लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचा मार्ग या कंपनीने निवडला. लोकांचे आरोग्य लक्षात घेऊनच या कंपनीने वाढत्या तापमानात लोकांना आरामदायी वाटावे म्हणून गुलाब सरबत, खस सरबत, बल सरबताचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला.
गुलाब सरबताचे फायदा काय?
गुलाब सरबताचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. कारण हे सरबत पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते. हे सरबत तयार करण्यासाठी थेट शेतकऱ्यांकडून गुलाब खरेदी केले जाते. अशा प्रकारच्या खरेदीमुळे अशुद्ध फुलं मिळण्याची शक्यता कमी होते. विशेष म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेतूनच या सरबताची निर्मिती केली जाते. हे सरबत तयार करताना इतर औषधी वनस्पती मिसळल्या जातात.