Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंवर हल्ला, विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की

या कार्यक्रमात डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि जवळपास दीड तास सुप्रियो यांचा रस्ता अडवून ठेवला. शिवाय बाबुल सुप्रियो यांच्यासोबत धक्काबुक्कीही करण्यात आली.

प. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंवर हल्ला, विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की
Follow us
| Updated on: Sep 19, 2019 | 10:44 PM

कोलकाता : पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका टोळक्याने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो (Babul Supriyo attack) यांना घेराव घातला आणि काळे झेंडे दाखवले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या कार्यक्रमाला बाबुल सुप्रियो (Babul Supriyo attack) गेले असता हा प्रकार घडला. या कार्यक्रमात डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि जवळपास दीड तास सुप्रियो यांचा रस्ता अडवून ठेवला. शिवाय बाबुल सुप्रियो यांच्यासोबत धक्काबुक्कीही करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच राज्यपालही घटनास्थळी पोहोचले, पण त्यांचीही वाट अडवण्यात आली. नंतर राज्यपाल आणि बाबुल सुप्रियो एकाच गाडीतून बाहेर जाण्यास निघाले तेव्हा दोघांनाही विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. धक्कादायक म्हणजे यावेळी बाबुल सुप्रियो यांचे कपडेही फाटले आणि त्यांच्या केसांना धरुन ओढण्यात आलं.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बाबुल सुप्रियो सत्राला संबोधित करण्यासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले, “मी इथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. विद्यार्थ्यांच्या वर्तवणुकीमुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला घेराव घातला, त्यावर मी नाराज आहे.” या परिसरात बाबुल सुप्रियो यांच्यावर बॉटल फेकण्यात आल्या आणि त्यांचा चष्माही तोडण्यात आल्याची माहिती आहे.

घटनेच्या वेळी आलेल्या पोलिसांना विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आत येण्यास मनाई केल्याचा आरोप आहे. यानंतर राज्यपाल मार्ग शोधत या परिसरात दाखल झाले आणि बाबुल सुप्रियो यांना परत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यपालांच्या गाडीची वाट अडवली.

कोण आहेत बाबुल सुप्रियो?

बाबुल सुप्रियो हे प्रसिद्ध कलाकार, अभिनेते असून भाजपचे पश्चिम बंगालमधील महत्त्वाचे नेते आहेत. असन्सोल मतदारसंघाचे ते खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांच्यावर पर्यावरण, वन आणि वातावरण बदल या मंत्रालयांची जबाबदारी आहे. 2014 मध्ये सुप्रियो यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये ज्या दोन जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी एक बाबुल सुप्रियो होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही सुप्रियोंवर विविध मंत्रालयांची जबाबदारी होती. सर्वात तरुण केंद्रीय मंत्री होण्याचा मानही त्यांनी मिळवला होता.

'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?
कराडला तुरुंगात बेदम मारहाण? बीडच्या तुरूंगात कोणी घातला राडा?.
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान
देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान.
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर
जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? 'ही' नावं आघाडीवर.
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी
'.. मग कोणाच्या कानाखाली काढणार?' राऊतांची ठाकरेंवर टोलेबाजी.
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'
आता मुंबईतच सिंगापूर... निसर्गाच्या सान्निध्यातील पहिलाच 'उन्नत मार्ग'.