बादशाहावर शिवभक्त संतापले, अश्लील गाण्यात जोडले भगवान शंकराचे नाव

badshah song | रॅपर बादशाह याने देशभरात वाद निर्माण केला आहे. त्याच्या एका गाण्यामुळे देशभरातून संपात व्यक्त केला जात आहे. या गाण्यात अश्लिल शब्द वापरला आहे. तसेच भगवान भोलेनाथ यांचे नाव घेतले आहे. यामुळे देशभर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु आहे.

बादशाहावर शिवभक्त संतापले, अश्लील गाण्यात जोडले भगवान शंकराचे नाव
badshah song
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 11:14 AM

उज्जैन : फेमस सिंगर व रॅपर बादशाह विरोधात देशभरातून संपात व्यक्त केला जात आहे. या प्रसिद्ध रॅपरच्या ‘सनक’ अल्बममधील एका गाण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. या गाण्यात अश्लिल शब्द आहेत अन् गाण्यात भगवान भोलेनाथ यांचे नाव घेतले गेले आहे. यामुळे बादशाहवर देशभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची तयारी चालवली आहे. बादशाहने माफी मागून गाणे मागे घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर देशभरात गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असे महाकाल सेना, पुजारी महासंघ आणि हिंदू संघटनांनी म्हटलंय.

गाणे यूट्यूबवर चांगलेच व्हायरल

बादशाहचे हे गाणे यूट्यूबवर चांगलेच व्हायरल होत आहे. आतापर्यंत 18 दशलक्षाहून अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे. गाण्यात अश्लील शब्दांचाही वापर करण्यात आला आहे. ‘भोलेनाथ से मेरी बनती है’ असे अश्‍लील शब्दांमध्ये बोलले जात आहे. गाण्याच्या या भागावर आक्षेप घेतला जात आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी या गाण्याबद्दल नाराजी व्यक्त करत हा सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मात्र, या वादावर बादशाहकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

काय आहे वाद

महाकालचे ज्येष्ठ पुजारी महेश पुजारी यांनी बादशाहच्या गाण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, कोणताही गायक, अभिनेता-अभिनेत्री असो, त्यांना देवाच्या नावावर अश्लीलता पसरवण्याचा अधिकार नाही. सनातन धर्मात दिलेल्या सवलतीचा गैरवापर होत आहे.

2 मिनिटे 15 सेकंदाचे गाणे जोरदार ट्रेंड

बादशाहचे 2 मिनिटे 15 सेकंदाचे नवीन गाणे सध्या चांगलेच ट्रेंड करत आहे. गाण्याच्या 40 सेकंदांनंतर म्हटले आहे की, कभी सेक्स तो कभी ज्ञान बनता…. त्यानंतर भगवान शंकर यांचे नाव घेतले आहे. या गाण्यावर शिवभक्त संतापले आहेत.

आधी हा झाला होता वाद

उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. यादरम्यान महाकाल मंदिर परिसर आणि इतर ठिकाणी असलेल्या मंदिरात अनेक भाविकांनी इन्स्टाग्रामसाठी रिले बनवतात. ज्यामध्ये फिल्मी गाण्यांवर बनवलेले व्हिडिओ व्हायरल केले जातात. इंदूरमधील एका महिलेने असाच एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.