कोण आहेत जया किशोरी? बागेश्वर बाबा आणि त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चाच चर्चा

लग्नाचं बोलायचं झालं तर गुरुंकडून परवानगी मिळाली आहे, आई-वडिलांची इच्छाअसेल तेव्हा ते लग्न लावून देतील, असं वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलंय.

कोण आहेत जया किशोरी? बागेश्वर बाबा आणि त्यांचं लग्न होणार असल्याची चर्चाच चर्चा
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 4:18 PM

नवी दिल्लीः माइंड रिडिंग (Mind Reading) आणि अनोळखी व्यक्तीबद्दल माहिती सांगण्याचा दावा करणारे बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) सध्या जोरदार चर्चेत आहेत. मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) असं त्यांचं नाव आहे. बागेश्वर बाबा महाराष्ट्रात येऊन गेल्यापासून सोशल मीडियावर त्यांची वक्तव्य, दावे, भूमिका वेगाने व्हायरल होत आहेत. बागेश्वर बाबांसोबत आता एका नावाची नव्याने चर्चा सुरु आहे. हे नाव आहे जया किशोरी. या दोघांचं लग्न होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

अर्थात बागेश्वर बाबा यांनी जया किशोरी यांचं नाव जोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे. एका मुलाखतीत त्यांना थेट सवाल विचारण्यात आला. तुम्ही जया किशोरी यांच्यासोबत लग्न करणार आहात का?

यावर बागेश्वर बाबा म्हणाले, जया किशोरी यांना मी अद्याप भेटलोही नाही. जया किशोरी माझ्या बहिणीप्रमाणे आहेत. बागेश्वर बाबांनी स्पष्टच सांगितलं असलं तरीही त्यांच्यासोबत चर्चेत असणाऱ्या या जया किशोरी नेमक्या कोण आहेत, अशी उत्सुकता अनेकांना आहे.

कोण आहेत जया किशोरी?

  • जया किशोरी या कोलकाता येथील रहिवासी आहे. त्यांचा जन्म 1996 साली झालाय.
  •  जया किशोरी या भजन गायिका, कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकरदेखील आहेत.
  •  आयुष्यातील समस्या कशा सोडवायच्या यावर त्या भाषण देतात.
  •  जया किशोरी यांचे वडील शिवशंकर शर्मा तर आईचं नाव सोनिया शर्मा आहे.
  •  सोशल मीडियावर जया किशोरी यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरही ४७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही त्या लोकप्रिय आहेत.

लग्नाबद्दल जया किशोरी काय सांगतात?

सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय असल्याने जया किशोरी यांना प्रेक्षकही असंख्य प्रश्न विचारत असतात. जया किशोरी कुणासोबत लग्न करणार, असा प्रश्न विचारला जातोय. एका व्हिडिओद्वारे या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. त्यात जया किशोरी म्हणतात, मी कोलकात्याची राहणारी आहे. त्यामुळे इथलाच मुलगा मिळाला तर बरं होईल..

कोलकात्याच्या बाहेरील व्यक्तीशी लग्न करायचं म्हटलं तर त्याने इथे येऊन रहावे, अशी माझी अट आहे. माझ्या आई-वडिलांसोबत रहावे, असे मला वाटते.

बागेश्वर बाबा काय म्हणाले?

बागेश्वर बाबांनी दिलेल्या माहितीनुसार, जया किशोरी यांना ते भेटलेही नाहीत. त्यांना मी बहिणीप्रमाणे मानतो, असे बागेश्वर बाबा म्हणालेत. लग्नाचं बोलायचं झालं तर गुरुंकडून परवानगी मिळाली आहे, आई-वडिलांची इच्छाअसेल तेव्हा ते लग्न लावून देतील, असं वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलंय. त्यामुळे जया किशोरी यांच्याशी त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.