AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूनियाच्या त्या पोस्टने जखमेवर मीठ चोळले, टीका होताच पोस्ट डिलीट; काय होतं पोस्टमध्ये?

कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनात सामील झालेल्या बजरंग पूनियाने एक पोस्ट शेअर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या पोस्टवर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली आहे.

पूनियाच्या त्या पोस्टने जखमेवर मीठ चोळले, टीका होताच पोस्ट डिलीट; काय होतं पोस्टमध्ये?
Bajrang PuniaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 6:40 AM

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या 23 एप्रिलपासून देशभरातील पैलवानांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. बजरंग पूनियाही या धरने आंदोलनात सामील झालेला आहे. पण हे आंदोलन सुरू असतानाच पूनियाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. मी बजरंगी आहे. मी बजरंग दलाचं समर्थन करतो. जय श्रीराम, असं पूनियाने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं होतं. सर्व बजरंगी भक्तांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर डीपी आणि स्टेट्सवर हा मेसेज ठेवावा. जय श्रीराम, असंही पूनियाने म्हटलं होतं. पण त्यावरून वाद झाल्याने त्याला ही पोस्ट डिलीट करावी लागली.

बजरंग पूनियाच्या पोस्टनंतर लगेचच भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांचा विरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या समर्थकांनी पूनियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पूनियाची कोंडी झाली आणि त्याने ही पोस्टच डिलीट करून टाकली.

हे सुद्धा वाचा

निर्वाणीचा इशारा

जंतरमंतरवर कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. केंद्र सरकारने या आंदोलनाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे देशभरातील खेळाडूंमध्ये संताप निर्माण झाला आहे. या खेळाडूंचं समर्थन करण्यासाठी शेतकऱ्यांनीही जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह हरियाणा आणि पंजाबच्या अनेक नेत्यांनी खेळाडूंशी संवाद साधला. शेतकऱ्यांनीही केंद्र सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 15 दिवसात बृजभूषण सिंह याला अटक केली नाही तर मोठा निर्णय घेऊ असा निर्वाणीचा इशाराच शेतकऱ्यांनी केंद्राला दिला आहे.

21 मार्चपर्यंत आंदोलन

कुस्तीपटूंच्या या आंदोलनात खाप शेतकरी संघटनाही उतरली आहे. या सर्वांची रोस्टरप्रमाणे ड्युटी लावण्यात आली आहे. 21 मेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. खेळाडूंचा अपमान सहन केला जाणार नाही. पैलवान देशाची संपत्ती आहे, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.

बृजभूषण सिंह यांचं आवाहन

दरम्यान, बृजभूषण सिंह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. तुम्ही दिल्लीत धडक देण्यापूर्वी तुमच्या आसपासच्या गावातील कोणत्याही पैलवानांना माझ्याबाबत विचारून घ्या. माझी लढाई ही ज्यूनिअर मुलांसाठी आहे. गरीब आई वडिलांना आपल्या मुलांना पैलवान करायचं आहे. त्यासाठीच माझी लढाई सुरू आहे. माझ्याविरोधात एकही गुन्हा सिद्ध झाला तर मला फाशीला लटकवा, असंही बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.