‘बाबरी शहीद केली अन् आता आणखी 3000..’; मौलाना तौकिर रजा काय म्हणाले? कोण आहेत ते?

त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय. त्यांनी देशभरातील मुस्लिमांना शुक्रवारपासून जेलभरो आंदोलन सुरु करण्याच अपील केलय. त्यांनी बाबरी मशिद, ज्ञानवापी मुद्यांवर मत मांडली. सीएए लागू होणार आहे, हा मुस्लिमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं ते म्हणाले.

'बाबरी शहीद केली अन् आता आणखी 3000..'; मौलाना तौकिर रजा काय म्हणाले? कोण आहेत ते?
maulana tauqeer raza
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 12:02 PM

नवी दिल्ली : इत्तेहाद मिल्लत काउंसिलचे (आईएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रजा खान यांनी देशात सुरु असलेल्या वेगवेगळ्या मुद्यांवर आपल मत मांडलय. त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाबरी मशिदीला शहीद केलं. आता आणखी 3000 हजार मशिदींची यादी बनवलीय” असं तौकीर रजा म्हणाले. ASI, कोर्ट आणि सरकारवर विश्वास उरला नसल्याच तौकीर रजा म्हणाले.

तौकीर रजा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत जेल भरो आंदोलन सुरु करण्यास सांगितलं. त्यांनी देशभरातील मुस्लिमांना साथ देण्याच अपील केलय. शुक्रवारी जेल भरो आंदोलन होईल. मौलान तौकीर रजा म्हणाले की, “देशातील मशिदींवर रोज बुलडोझर चालवला जातोय. ज्ञानवापीची परिस्थिती तुमच्या सगळ्यांसमोर आहे. पण अशा अनेक मशिदी तोडण्यात आल्या आहेत. म्हणून सगळ्या जगात देशातील कायदा बदनाम होत आहे”

3000 मशिदींची यादी तयार

“बाबरी मशिदीला शहीद केलं. पण ज्ञानवापीला शहीद होऊ देणार नाही. बाबरी मशिदीच्या बाबतीत बेईमानी केली. तेच आता ज्ञानवापीच्या बाबतीत होतय” असं तौकीर रजा म्हणाले. या दरम्यान मौलानाने मथुराच्या शाही ईदगाहच सुद्धा उल्लेख केला. त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलं की, “हा सर्व 80/20 चा खेळ चाललाय. बाबरी आणि ज्ञानवापी शिवाय देशभरातील 3000 मशिदींची यादी बनवल्याच ते म्हणाले”

मानवतेच्या मारेकऱ्याला भारतरत्न

लालकृष्ण आडवाणींना भारत रत्न पुरस्कार देण्यावरही त्यांनी टीका केली. मानवतेच्या मारेकऱ्याला भारत रत्न पुरस्कार दिला असं ते म्हणाले. सीएए कायद्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. सीएए लागू होणार आहे, हा मुस्लिमांच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं ते म्हणाले. सरकारी तंत्रावर विश्वास ठेवण हे स्वत:ला फसवण्यासारख आहे, असं ते म्हणाले. कुठल्याही चौकशी समितीवर विश्वास ठेऊ नका असं ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.