Chandrayaan 3 landing | लँडिंगआधी एका सरकारी कंपनीने रचला इतिहास, शेअर्समध्ये इतकी तेजी कशी?
Chandrayaan 3 landing | सगळं जग या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहे. या यशासोबत काही कंपन्यांच यश जोडलेलं आहे. ज्यांनी इस्रोच्या मिशनमध्ये योगदान दिलय.
बंगळुरु : आज भारतच नाही, जगभरात चांद्रयान-3 मिशनची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच मून मिशन फेल झालं होतं. आता सगळ्यांच्या नजरा चांद्रयान-3 वर आहेत. सगळं जग या मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहे. या यशासोबत काही कंपन्यांच यश जोडलेलं आहे. ज्यांनी इस्रोच्या मिशनमध्ये योगदान दिलय. आज चांद्रयान-3 च्या बळावर एका सरकारी कंपनीने इतिहास रचला आहे. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड हे त्या कंपनीच नाव आहे.
शेअर बाजारात या कंपनीचा शेअर रेकॉर्ड हाय किंमतीला पोहोचला होता. HAL जगातील एक जुनी एयरो स्पेस कंपनी आहे. चांद्रयान-3 च्या मून मिशनमध्ये या कंपनीने मोलाची मदत केलीय. चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंगमध्ये यशस्वी ठरल्यास हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला फायदा होईल.
आपलाच रेकॉर्ड 25 दिवसात मोडला
मुंबई स्टॉक एक्सचेंजमधील आकड्यांनुसार कंपनीचा शेअर 4,024 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने आपलाच रेकॉर्ड 25 दिवसात मोडला. याआधी 31 जुलैला कंपनीचा शेअर रेकॉर्ड हाय किंमतीला पोहोचला होता. एचएएलच्या शेअरमध्ये सकाळपासून वाढ पहायला मिळतेय. दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी HAL च्या शेअर्सचा भाव 124.05 रुपये वाढीसह 4015.05 वर बिझनेस करत होता. कंपनीचा शेअर 3914.95 रुपयांसह ओपन झाला होता. एकदिवस आधी कंपनीचा शेअर 3891 रुपयांवर बंद झाला होता. मून मिशनमध्ये HAL च योगदान काय?
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने चांद्रयान 3 मध्ये महत्त्वाच योगदान दिलं. पब्लिक सेक्टरमधील या कंपनीने नॅशनल एयरोस्पेस लेबोरेटरीजला (एनएएल) मिशनमध्ये उपयुक्त ठरणाऱ्या उपकरणांचा पुरवठा केला. HAL कंपनी विमान आणि हेलिकॉप्टर निर्मितीमध्ये आहे. कंपनीला जूनच्या क्वार्टरमध्ये 814 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. मागच्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 30 टक्क्याने जास्त आहे.