बेळगावच्या पालकमंत्र्यांची आक्षेपार्ह सीडी सार्वजनिक, कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ
कर्नाटकातील भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत.
कोल्हापूर : गेल्या काही काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर आता कर्नाटकातही एका सीडी प्रकरणानं खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या भाजप सरकारमधील जलसंसाधन मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे व्हिडीओ व्हायरल केले आहेत. हे व्हिडीओ व्हायरल करताना त्यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे.(Belgaum Guardian Minister Ramesh Jarkiholi’s offensive CD goes viral)
नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार?
जारकीहोळी यांनी नोकरीचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. कलहळ्ळी यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. त्याचबरोबर पीडित तरुणीला सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. कलहळ्ळी यांनी जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. या सीडीमध्ये जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा त्यांनी केलाय.
नोकरी देण्यास नकार, तरुणीकडून व्हिडीओ व्हायरल?
कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे भाजप सरकारमध्ये मोठी खळबळ माजली आहे. नोकरी लावण्याचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. नोकरीचं आमिष दाखवून अत्याचार केले. मात्र पुढे नोकरी देण्यास नकार दिल्यानंतर तरुणीने जारकीहोळी यांच्यासोबतचे काही क्षण रेकॉर्ड केले. बाब समजल्यानंतर जारकीहोळी यांनी संबंधित तरुणीला याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, व्हायरल झालेले हे व्हिडिओ साधारण महिनाभरापूर्वीचे असल्याचं सांगितलं जात आहे.
मानवी हक्क आयोगाचे दिनेश कलहळ्ळी यांच्याकडे संबंधित तरुणीच्या कुटुंबियांनी आपलं गाऱ्हाणं मांडल. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी कलहळ्ळी यांनी केली आहे.
इतर बातम्या :
Pooja Chavan case | पूजा चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट, वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसात तक्रार
Belgaum Guardian Minister Ramesh Jarkiholi’s offensive CD goes viral