रॉबर्ट वाड्रांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाची धडक; बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Income Tax sleuths at Robert Vadra’s residence)

रॉबर्ट वाड्रांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाची धडक; बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू
Follow us
| Updated on: Jan 04, 2021 | 2:54 PM

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आयकर विभागाचं एक पथक धडकलं असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. (Income Tax sleuths at Robert Vadra’s residence)

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, ते आयकर कार्यालयात चौकशीसाठी आले नव्हते. त्यामुळे आयकर विभागाचे अधिकारीच वाड्रा यांच्या घरी दाखल झाले असून त्यांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जात असून गेल्या अर्ध्या तासांपासून ही चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

साऊथ ईस्ट दिल्लीतील सुखदेव विहार येथील वाड्रा यांच्या कार्यालयात त्यांचं स्टेटमेंट नोंदवलं जात आहे. बिकानेर आणि फरिदाबाद येथील जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने त्यांची चौकशी सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोना महामारीमुळे वाड्रा हे आयकर विभागाच्या कार्यालयात चौकशीला सामोरे गेले नव्हते. त्यामुळे त्यांची आज चौकशी केली जात आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जामिनावर, काय आहे प्रकरण?

दरम्यान, यापूर्वीच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडूनही त्यांची चौकशी सुरू आहे. लंडनमधील ब्रायंस्टन स्क्वेअर येथील एका संपत्तीच्या खरेदीत मनी लाँड्रिंगच्या आरोपांसंबंधी हे प्रकरण आहे. ही संपत्ती 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी करण्यात आली होती आणि या संपत्तीचे मालक रॉबर्ट वाड्रा असल्याचा दावा केला जातोय. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सध्या फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारीची चौकशी सुरु आहे. याच चौकशीतून मनोज अरोराचीही भूमिका समोर आली, ज्याच्या आधारावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असा आरोप केला जातो, की लंडनमधील ही संपत्ती संजय भंडारीने 19 लाख पाऊंडमध्ये खरेदी केली होती आणि 2010 मध्ये तेवढ्याच किंमतीला विकली. तर दुसरीकडे याच संपत्तीच्या डागडुजी आणि इतर कामावर 65 हजार पाऊंडचा खर्च करण्यात आल्याचं बोललं जातं. तरीही खरेदी केलेल्या रक्कमेतच ही संपत्ती रॉबर्ट वाड्रा यांना विकण्यात आली. याचाच तपास ईडीकडून केला जात आहे. (Income Tax sleuths at Robert Vadra’s residence)

संबंधित बातम्या:

मनी लॉड्रिंग प्रकरण : रॉबर्ट वाड्रांची ईडीकडून सहा तास चौकशी

सातव, केदार, वडेट्टीवार, ठाकूर, पटोले की चव्हाण?; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

नागपूरवाले मला म्यूट का करतात?; मुख्यमंत्र्यांचा सवाल

(Income Tax sleuths at Robert Vadra’s residence)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.