AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वक्फच्या नावाने मुर्शिदाबाद पेटतेयच..संतप्त जमावाने बापलेकाला ठार केले, कलम १६३ लागू, इंटरनेट बंद

वक्फ (दुरुस्ती) कायद्याच्या नावाखाली शनिवारी देखील पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्येही हिंसाचार उसळला. संतप्त जमावाने बापलेकाला ठार केले. मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाल्यानंतर कलम १६३ लागू करण्यात आले असून इंटरनेट बंद आहे. पोलीस आणि बीएसएफ संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे.

वक्फच्या नावाने मुर्शिदाबाद पेटतेयच..संतप्त जमावाने बापलेकाला ठार केले, कलम १६३ लागू, इंटरनेट बंद
| Updated on: Apr 12, 2025 | 6:42 PM
Share

वक्फ (सुधारणा) कायद्याच्या विरोधाक पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे शनिवारी देखील हिंसक झडप झाली. मुर्शिदाबाद येथे एका बापलेकाची हत्या करण्यात आली. शमशेरगंज परिसरातील जाफदाबाद येथे हिंसक जमावाने पिता-पूत्राची हत्या केली. एका गावावर जमावाने हल्ला केला. याआधी मुर्शिदाबाद येथे शुक्रवारच्या ( ११ एप्रिल ) नमाजनंतर हिंसा भडकली होती. हिंसात्मक घटनेनंतर मुर्शिदाबाद येथे कलम १६३ लागू केले असून इंटरनेट बंद आहे. पोलीस आणि बीएसएफचा जबरदस्त पहारा आहे. निदर्शकांनी पोलीसांच्या व्हॅन आणि एम्ब्युलन्स जाळून टाकल्या आहेत. याच दरम्यान, भाजपा नेते सुवेंदु अधिकारी यांनी मुर्शिदाबाद येथे केंद्रीय दलाच्या तैनातीच्या मागणीवरुन कोलकाता धाव घेतली आहे.

आधी सूतीत हिंसाचार झाला

मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसेच्या खुणा अजून मिटलेल्या नसताना आज पुन्हा या भागात पुन्हा हिंसा भडकली. यावेळी निदर्शकांनी एका बापलेकाची हत्या केली. मुर्शिदाबाद येथील सुतीत शुक्रवारी हिंसेला सुरुवात झाली होती. शुक्रवारची नमाज झाल्यानंतर वक्फ कायद्याच्या विरोधात अनेक निदर्शक रस्त्यावर उतरले. आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ३४ ब्लॉक केला. जेव्हा पोलिसांनी नॅशनल हायवेवरील जमावाला हटविण्याचा प्रयत्न केला तर निदशर्कांनी पोलिसांवर दगड फेक केली.

शमशेर गंजमध्ये गोंधळ

मुर्शिदाबाद येथून १० किमोमीटरवर असलेल्या शमशेर गंज येथेही नॅशनल हायवेवर हजारो लोक जमले होते. शमशेरगंजच्या डाक बंगल्या जवळ निदर्शकांनी तांडव माजविण्यास सुरुवात केली.येथे पोलिसांच्या वाहनांना पेटविण्यात आले.त्यानंतर येथील एका पोलिस चौकीला तोडफोड करुन आगीच्या हवाली करण्यात आले.रस्त्यांच्याकडेला असलेल्या दुकानांना आणि दुचाकींना आगीच्या हवाली करण्यात आले.

गाड्या तोडल्या, घरांना पेटविण्याचा प्रयत्न

हिंसक जमावाने धुलियान रेल्वे स्थानका शेजारील रेल्वे गेट आणि रिले रुमला लक्ष्य करण्यात आले.दगडांचा मारा करण्यात आला.घरांना पेटविण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी रेल्वेचे कर्मचारी स्वत:चे प्राण वाचवून कसेबसे पळाले. त्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक मागिवली. आता येथे केंद्रीय रिझर्व्ह बलाचे सैनिकांनी परस्थितीवर कसे तरी नियंत्रण मिळविले. आता या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.