Srabanti Chatterjee | बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपप्रवेश

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला. (actress Srabanti Chatterjee joins BJP)

Srabanti Chatterjee | बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपप्रवेश
बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 8:12 AM

कोलकाता : बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी (Bengali actor Srabanti Chatterjee) यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर चटर्जींनी भाजपप्रवेश केला. पश्चिम बंगालमधील प्रघातानुसार यंदाही निवडणुका ‘तारांकित’ होण्याची चिन्हं आहेत. (Bengali actress Srabanti Chatterjee joins BJP ahead of West Bengal Assembly Election)

पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा पक्षप्रवेश झाला.

भाजपमध्येही तारे-तारकांचे पक्षप्रवेश

पश्चिम बंगालच्या मनोरंजन विश्वामधील अनेक कलाकारांनी आतापर्यंत राजकारणात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून अनेक सेलिब्रिटी राजकीय रिंगणात उतरले आहेत. मात्र आता बंगालमध्ये पाय रोवणाऱ्या भाजपमध्येही तारे-तारकांचे पक्षप्रवेश होताना दिसत आहेत.

कोण आहेत श्राबंती चटर्जी? (Who is Srabanti Chatterjee)

33 वर्षीय श्राबंती चटर्जी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मायार बंधनमधून त्यांनी सिनेविश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर चॅम्पियन, भालोबासा भालोबासा, वाँटेड, फायटर, इडियट यासारख्या अनेक बंगाली चित्रपटात त्या झळकल्या आहेत.

श्राबंती चटर्जी यांच्या नृत्य कौशल्याचीही चुणूक अनेक गाण्यांमधून पाहायला मिळाली आहे. डान्स बांगला डान्स या रिअॅलिटी शोचं परीक्षणही त्यांनी केलं आहे. आता भाजपप्रवेशानंतर त्यांना विधानसभेचं तिकीट मिळणार, की त्या स्टार प्रचारक होणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

पश्चिम बंगालची राजकीय स्थिती काय?

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून 2 मे रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44, डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता. (Bengali actress Srabanti Chatterjee joins BJP ahead of West Bengal Assembly Election)

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

बंगालमध्ये कोणाची सत्ता?

विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यापासून पश्चिम बंगालच्या राजकारणाकडे सर्वांचे लक्ष आहे. बंगालची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने चांगलीच तयारी केली आहे. मात्र, बंगालमधील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनाच पसंती दिल्याचे ओपिनयन पोलमधून समोर येत आहे. एबीपी-सीव्होटरच्या ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 148-164 जागा मिळू शकतात. तर भाजपला येथे 92 ते 108 जागांवरच समाधान मानावे लागू शकते. पश्चिम बंगालमध्ये काँग्रस आणि डाव्या आघाडीला 31-39 जागा मिळू शकतात.

संबंधित बातम्या :

‘मिशन बंगाल’: ‘वाघीण’ सरस ठरणार की ‘कमळ’ फुलणार; वाचा पश्चिम बंगालचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट!

बंगालमध्ये पुन्हा ममता दीदी?, केरळमध्ये भाजपला भोपळा? वाचा कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार?

(Bengali actress Srabanti Chatterjee joins BJP ahead of West Bengal Assembly Election)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.