मुख्यमंत्री कोण होणार? कर्नाटकात पोस्टर वॉर; थोड्याच वेळात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसला बहुमत; मुख्यमंत्री कोण होणार? हालचालींना वेग

मुख्यमंत्री कोण होणार? कर्नाटकात पोस्टर वॉर; थोड्याच वेळात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 6:03 PM

बंगळुरू : कर्नाटकात काँग्रेस बहुमतात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे. अशात काँग्रेस आता मुख्यमंत्रिपद कुणाकडे देणार, याबाबतची चर्चा होतेय. काँग्रेस पक्षातील दोन नेत्यांची नावं सध्या दोन नावं आघाडीवर आहेत.

दोन नावांची जोरदार चर्चा

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी दोन नावं आघाडीवर आहेत. सिद्धारमैया आणि डी के शिवकुमार यांची नाव चर्चेत आहेत. सिद्धरामय्या हे कर्नाटक विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राहिले आहेत. तर डीके शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या रेस पाहायला मिळतेय. आता काँग्रेस हायकमांड कुणाच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची धुरा देतात हे पाहणं महत्वाचं असेल.

कर्नाटकात काँग्रेसमध्ये नवी जान आणण्यात आणि काँग्रेसला पुन्हा सत्तेची स्वप्न दाखवण्यात डी के शिवकुमार यांचा मोठा हात राहिला आहे. डी के शिवकुमार यांनी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवून देण्यात मोठा हात राहिला आहे. त्यामुळे डी के शिवकुमार यांची बाजू भक्कम असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

पोस्टर्स वॉर

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यां दोघांच्या घराबाहेर समर्थकांनी पोस्टर्स लावले आहेत. तसंच कर्नाटकात ठिकठिकाणी असे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत. काँग्रेसच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर भावी मुख्यमंत्री असाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भावी मुख्यमंत्री म्हणत दोघांच्या समर्थकांनी पोस्टर्स लावल्याने पोस्टर वॉर सुरू झालं आहे.

थोड्याच वेळात काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक पार पडतेय. या कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करण्यात येणारी आहे.

कर्नाटक विधानसभेत 224 मतदारसंघ आहेत. यातील 137 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपला केवळ 65 जागा जिंकता आल्या आहेत. तर माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जेडीएसने 19 जागा जिंकल्या आहेत. यात आठव्यांदा आमदार झालेलेल शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसाठी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे बंगळुरूसाठी रवाना झाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटक सरकार स्थापनेबाबत मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पर्यवेक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदेंकडे जबाबदारी आहे. सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी शिंदे बंगळुरूसाठी रवाना झालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.