Wife Murder: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून पत्नीची हत्या; बायको बेपत्ता असल्याची दिली तक्रार; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीने शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तिची हत्या करून पत्नीचा मृतदेह शिर्डी घाटात फेकून दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने पत्नील का मारल्याचे सांगत गुन्हा कबूल केला आहे.

Wife Murder: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून पत्नीची हत्या; बायको बेपत्ता असल्याची दिली तक्रार; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांना संपवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 10:30 AM

बेंगळुरूः बिहारमधील इलेक्ट्रिशियन, जो बेंगळुरूमध्ये (Bengaluru) राहत होता, त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत लैंगिक संबंध (physical relation) ठेवण्यास नकार दिला म्हणून त्याने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह शिराडी घाटात फेकून दिला होता. त्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने नंतर एक गोष्ट रचली आणि आपली पत्नी बेपत्ता (Wife missing) झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. बेंगळुरूमध्ये घडलेल्या या धक्कादायक गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव आहे पृथ्वीराज सिंग (Prithviraj Singh) असून त्याने नऊ महिन्यांपूर्वीच ज्योती कुमारीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर मात्र आपल्या पत्नीने तिच्या वयाबद्दल आपल्याला खोटे सांगितल्याचा राग त्याच्या मनात होता. त्या दोघांमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद होत होते, त्यामुळे पत्नीने त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासही देत नेहमी नकार देत होती.

लग्नाच्या वेळी तिने नवऱ्याकडच्या कुटुंबीयांना सांगितले होते की ती 28 वर्षांची आहे, मात्र नंतर तिचे खरे वय हे 38 असल्याचे समजल्यानंत आणि दहा वर्षाचा फरक असल्याचे समजल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते.

शरीरसंबंध ठेवण्यास कायम नकार

या दोघांच्या लग्नानंतर तिने त्याच्यासोबत कधीही शरीरसंबंध ठेवण्यास सहमती दर्शवली नव्हती. लग्नातही मानापमानाच्या गोष्टीमुळे आणि पत्नीच्या या वयाच्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत होते. लग्नानंतर आपल्या आईवडिलांचा अपमान करत असल्याचेही सिंगने पोलिसांना सांगितले.

…आणि पत्नीचा काटा काढला

कौटुंबीक वाद वाढत गेल्यानेच संतापलेल्या सिंगने ज्योतीला संपवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर त्याने बिहारमधील आपला मित्र समीर कुमारला पत्नीचा काटा काढण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी दोघे उडापीला गेले, तेथे त्यांनी ज्योतीची गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह शिर्डी घाटात फेकून दिला. पत्नीचा खून करुन घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

नवऱ्याने सांगितले पत्नी बेपत्ता

याप्रकरणात सिंगने पोलिसांना सांगताना एक गोष्ट रचली होती, त्याने पोलिसांना सांगितले की, ज्योती अनेक वेळा घरातून न सांगताच निघून जायची आणि नंतर स्वतःच ती परत यायची. मात्र यावेळी तिचा मोबाईल बंद असल्याने तो तिचा शोध घेऊ शकला नाही असं त्याने पोलिसांना स्पष्टपणे सांगितले.

कारनामा उघडा पडला

मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चालू केल्यानंतर मात्र सिंगच्या कारनामा उघडा पडला. आणि सिंगवर पोलिसांचा संशय बळावला, त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पत्नीची हत्या करून कुठे टाकलेले हे सांगितल्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह दरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.